सोलापूर मधील उन्हाने त्रस्त झालेल्या लोकांना थोडासा विसावा
शिवशाही वृत्तसेवा,जगदीश कोरीमठ जिल्हा प्रतिनिधी
साधारण मार्च महिन्यापासून उन्हाच्या पारा सोलापुरात वाढत जातो त्यामुळे येथील नागरिक हैराण होतात. उन्हाच्या झळा मुळे प्रत्येकाला सावलीची गरज असते त्यामुळे कुठे उन्हात खरेदी करण्यास जाता येत नाही तरी पण लग्न सीजन मध्ये जनतेला दुपारी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून नवी पेटीतील व्यापाऱ्यांनी यावर झकास आयडिया शोधून काढले आहे नवी पेटीतील चोपडा विठ्ठल मंदिर पासून भारत वाचनालय पर्यंत दहा ते पंधरा व्यापारी मिळून साधारण वीस हजार खर्च करून सुंदर असा मंडप उभा केला आहे.
अशा मुळे हजारो नागरिकांना उन्हात ये जा करणे सोयीचे झाले आहे कित्येक जण विसावा घेण्यासाठी तासनतास तिथेच थांबतात आणि व्यापाऱ्यांना धुवा देतात. खरोखर अत्यंत कौतुक कराव ते कमीच आहे .. खरे तर सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिरातील असे गेट पासून मंडप गरजेचे आहे परंतु असे दृश्य दिसत नाही मंदिरात देखील उन्हात रोज हजारो लोक दर्शनासाठी येतात तरी जनतेची मागणी आहे की प्रत्येक द मंदिरात येणारे देणगीतून अजय हिरव्या कापडाचे छत घालून लोकांना उन्हाच्या चटक्यापासून वाच वाचवता येईल.
नवी पेटतील व्यापाऱ्यांनी स्वखर्चाने मंडप घालून येणाऱ्या जनतेलाही उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून दररोज पाच ते दहा थंड पाण्याचे जग तहान भागवण्यासाठी मार्च करून आतापर्यंत ठेवले आहेत.. सोलापूर मध्ये जून पर्यंत उन्हाळा जाणवतो त्यामुळे प्रत्येक मंडळांनी असे कार्य हातात घ्यावे बॅनरबाजी साठी खर्च करू नये अशी सर्व जनतेची मागणी होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा