पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नायगाव तालुक्यातील परडवाडी येथे जय मल्हार युवा सेनेच्या वतीने राजे मल्हारराव होळकर व पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या चौकाचे अनावरण प्रख्यात बालाजी पेटेकर खतगावकर, यांच्या हस्ते करण्यात आले.विचारवंत,प्रा.डाॅ गोविंद पाटील सर यांच्या हस्ते पिवळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच,दशरथ पाटील कौटकर हे होते.प्रा.डाॅ. गोविंदराव परडे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.त्यानंतर व्याख्याते बालाजी पेटेकर यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.
प्रा.गोविंद पाटील वझरगेकर यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.यावेळी नारायण पा.कराळे, प्रभाकर पा.कौटकर ईरबा पा.वजीरगे,संदीप परडे,गौदाजी पा.परडे, हनुमंतराव पा.खनपट्टे, नारायण पा.कौटकर,हौसाजी खणपटे,अविनाश पा.कराळे,विनोद परडे,भीमसेन परडे,हे उपस्थित होते.यावेळी कु.जानवी कौटकर,श्रावणी कराळे,अहिलेश्वरी कराळे,प्रगती कोकणे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा