तिसरा मुलगाही एम.बी.बी.एस च्या पहिल्या वर्षात यशस्वी .
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
मनात जिद्द असेल तर जिद्दीच्या जोरावर व्यक्ती कुठल्या कुठे जाऊ शकतो .मिनाबाई संघपाल भोरे, भानेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून त्यांना तिनं अपत्य आहेत. ते मूळचे भानेगाव येथील रहिवासी असून ते हदगाव येथे आपले सासू-सासरे व दोन मुलं एक मुलगी यांच्या शिक्षणासाठी म्हणून हदगाव येथे स्थायिक झाले. संघपाल भोरे यांचे निवघा बाजार येथे इलेक्ट्रॉनिकचे सुरभी इलेक्ट्रॉनिक नावाने दुकान आहे.
तर त्यांचे दोन दीर शिक्षक असून एक भंडारा तर दुसरा किनवट येथे राहतो. त्यांची मोठी मुलगी डॉ. संध्या नंतर डॉ. मंगेशने देखील नुकतीच एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केली. धाकटा मुलगा तेजसचे देखील औरंगाबाद येथे एम.बी.बी.एस. चे शिक्षण सुरू आहे. निवघा येथे छोटासा व्यवसाय करत व्यवसायात वडिलांनी उत्तुंग भरारी घेत आपल्या तिन अपत्यांना घडवल्यामुळे परिसरातील व्यापारी बांधव तिन अपत्याना डॉक्टर बनवणाऱ्या संघपाल भोरे यांचे व त्यांची पत्नी मीनाताई यांचे कौतुक करीत आहेत. डॉ. मंगेशला एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त झाली ही माहिती हदगाव तालुक्यातील भानेगावात कळताच संघपाल भोरे यांचा मुलगा डॉ. मंगेश संघपाल भोरे यांचे फोनवरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
त्याचा पदवीग्रहण सोहळा दि ०२/०७/२०२३ रोजी लातूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कुकडे यांच्या हस्ते सहाय्यक आयुक्त टाकसाळे यांच्या उपस्थितीत पदवीग्रहण सोहळ्यात मंगेशला पदवी प्रदान करण्यात आली. त्यावेळी आई मिनाबाई, वडील संघपाल,आजी रुख्मिनाबाई व सेवानिवृत्त शिक्षक असलेले आजोबा मल्हारी भोरे गुरुजी, संगीत विषयाचे अधिव्याख्याता प्रा.डाँ. राहुल भोरे काका व किनवटचे काका डॉ. अनिल भोरे, आत्या, बहिण, भावा सह सर्व मित्र मंडळांना आनंद झाला. तेजस संघपाल भोरे हा घाटी येथे दुसऱ्या वर्षासाठी एम.बी.बी.एस. साठी छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्या वर्षी पास होऊन एम.बी.बी.एस च्या दुसर्या वर्षाची तयारी करीत आहे. यामुळे भानेगाव गावातील सरपंच, उपसरपंच ,पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार मंडळी तर्फे भोरे कुटुंबाचे कौतुक करण्यात येत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा