मोटरसायकल तरी पोलिसांना शोधण्यास यश येईल का असा सवाल
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
माहुर येथील भारत फायनास कंपनिमध्ये मागील दोन महीन्या पासून हदगाव येथील क्रष्णा बालाजीराव चिलवेरी वय २४ खाजगी जाॅबवर नोकरी करीत आहे. दि २७ रोजी क्रिष्णा चिलवेरी हा चौथा शनिवार ऑफीसला सुट्टी असल्यामुळे दुपारी १ वाजताचे सुमारास आपल्या आईवडिलांना भेटायला म्हणून हदगावकडे त्याचे मालकीचे बजाज पल्सर एम एच २६-सि.जी ५५२७ ने येत असताना ग्राम धनोडा ता महागाव गावाचे नदीचे पुला जवळ समोरुन मोटरसायकलचा चालक गणेश बाबु जाधव रा लांजी व त्यांचा मित्र असे दोन व्यक्तीने डबल सीट मोटरसायकलने भरधाव वेगात निष्काळजीपणे आपले वाहन चालवून कृष्णा चिलवेरी यांच्या मोटरसायकलला जोरात धडक दिली.
झालेल्या भिषण अपघातात कृष्णा चिलवेरी स्वताचे गाडीसह रोडवर पडला त्यामुळे अक्षरशः उजव्या पायाचे पंजामध्ये गाडीचा ब्रेक खुपसला व दोन्ही हाताला खरचटल्यामुळे गंभीर दुखापत झाली. तेथील नागरिकांनी कृष्णाला उचलुन रस्त्याचे बाजुला केले .सोबत माहुर येथे काम करणारे निलेश कांबळे याना त्याने फोन द्वारे झालेला प्रकार सांगुन त्याला तेथे घडलेल्या ठिकाणी बोलावुन घेतले तेव्हा त्याचा मित्र लगेच तेथे पोहचुन निलेश कांबळे याने त्याला १०८ अॅम्बुलसने सरकारी दवाखाना यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी दाखल केले.कृष्णा चे वडील माजी नगरसेवक बालाजी चिलवेरी यांनी आपल्या मुलाच्या उजव्या पायाचे पंजाला जास्त मार लागला असं तेथील डॉक्टरांनी सांगितले असल्यामुळे त्याला तेथे तात्पुरती मलम पट्टी करुन पुढील उपचारासाठी उमरखेड येथील डॉ. बंग याचे खाजगी रुग्णालयात हलविले दि २८ रोजी उजव्या पायाच्या पंजाला चार बोटांच्या हाडाचा चुराडा झाला असल्याचे सांगून डॉ बंग यांनी ऑपरेशन करून चार रॉड टाकले सतत तिन दिवसानंतर सुट्टी होऊन कृष्णाला घरी हदगाव येथे आनले. आता मुलाला घरी आणले.
मुलाची मोटर सायकल घरी आणण्यासाठी म्हणून वडील गेले असता घटनास्थळावरून नवीन घेतलेली मोटरसायकल सुद्धा गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी मोटरसायकल वर लक्ष ठेवा म्हणून ज्यांच्यावर वडीलांनी जबाबदारी दिली होती ते म्हणाले आम्ही रात्री इथे नव्हतो. ज्या मोटार सायकलमुळे सदर अपघात झाला तो गणेश बाबु जाधव रा लांजी सदर यक्तीविरुदध योग्य कायदेशीर कार्यावाही व्हावी . तसेच आमची चोरीला गेलेली मोटरसायकल सुद्धा मिळून द्यावी ह्यासाठी महागाव पोलीस स्टेशन मध्ये वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे. सदर मोटरसायकल तरी पोलिसांना शोधण्यास यश येईल का असा सवाल परिसरात करण्यात येत आहे..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा