१५ व्या वित्त आयोगाच्या कामात अनियमितता व मुलाचा हस्तक्षेप आला अंगलट
शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री (प्रतिनिधी तातेराव बनसोडे)
बोधेगाव बु.येथील सरपंच सुमनबाई काशिनाथ ढेपले यांच्या विरोधात सहा सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव सोमवारी पारित झाला. सदस्यांना विश्वासात न घेणे पंधरावा वित्त आयोगाच्या कामात अनियमितता, त्याच्या मुलाचा ग्रामपंचायत कामात हस्तक्षेप अशा प्रकारचा ठपका त्याच्यावर आहे. तहसीलदार शीतल राजपूत यांनी सोमवारी ५ जून रोजी सकाळी ११वाजता अविश्वासावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलावली होती.
ग्रामपंचायतीत एकूण 9 सदस्य आहेत. त्यामधून दोन सदस्य अपात्र ठरल्याने त्यांना या प्रक्रियेत भाग घेता आला नाही. सरपंचाविरोधात सहा सदस्यांनी सह्या केल्या व अविश्वास ठराव पारित झाला. पारित कणाऱ्या सदस्यांची नावे १)कैलास दामोदर कुंटे २)राजेंद्र चोखाजी वाघ ३)अर्चना कैलास कुंटे ४)अंकुश रामचंद्र कुंटे ५)शीतल किरण रजपूत 6)मंदाबाई संजय वाघ आदींचा समावेश आहे. अविश्वास ठराव परित प्रक्रियेत मंडळ अधिकारी पी. आर. कदम, तलाठी जयश्री तायडे, ग्रामसेवक व्ही. आर जरारे यांनी काम पहिले. ग्रामसेवक व्ही. आर. जरारे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. सभा १२:३० संपली असे जाहीर केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा