नुतन तहसीलदार म्हणून एस.एन. अंध्देश्वर रुजु.
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
तहसिलदार पदी शंकरराव एन. अंध्देश्र्वर यांची नियुक्ती झाली आहे. नुकताच दि:५ जुन रोजी त्यानी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. यापूर्वी एस.एन.अंदेश्वर यांनी धर्माबाद पुरवठा विभागातुन सन २०२१ मध्ये बदलीवर बिलोली येथिल तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून काम केले .येथील तत्कालीन तहसीलदार दत्तात्रय एन.शिंदे यांची लातुर येथे प्रशासकीय बदलीचे आदेश गेल्या महिन्यात काढले होते.
डि.एन.शिंदे यांच्याकडे धर्माबाद व उमरीचे तहसीलदार आणि धर्माबादचे प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार होता.परंतु या ठिकाणी बदली हुन आलेले तहसीलदार परांडेकर यांची पदोन्नती झाल्याने त्यांनी रूजु झाले नाहीत. म्हणून जिल्हाधिकारी यांनी डि.एन.शिंदे यांना येथून सोडले नव्हते. नुकतेच शासनाने नायब तहसीलदार पदावरून तहसीलदार म्हणून पदोन्नती झालेले एस.एन.अंदेश्वर यांची धर्माबादचे तहसीलदार म्हणून आदेश दिले,त्या अनुषंगाने दि.५ जुन रोजी एस.एन.अंध्देश्वर यांनी तहसीलदार पदी पदभार स्वीकारला तर बदलीवर गेलेले तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांना निरोप समारंभ घेऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी,ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते,स्वस्त धान्य दुकानदार संघटना व तहसील कार्यालयाच्या वतीने तहसीलदार डि.एन. शिंदे यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.यावेळी प्रशासनाचे काम करतांना धर्माबाद येथील जनता व प्रशासनाने मला खुप सहकार्य केले. हे मी कधीही विसरू शकणार नाही. येथे माझे सेवेचे पावने चार वर्ष कसे गेले हे मलाही कळाले नाही धर्माबादकरांचा प्रेमळ पणा माझ्या स्मरणात राहील. असे तहसीलदार डि.एन.शिंदे यांनी बोलून दाखवले.शासनाच्या कामात दक्ष राहून जनतेच्या सेवेत मी कधी ही कमी पडणार नाही.
असे शंकरराव अंध्देश्वर यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार एस.एम.पांडे,बी.आर.गावंडे, पुरवठा विभाग नायब तहसीलदार राठोड, तहसिल कर्मचारी एस.व्ही. वारेवार,डि.सी.भुरे,पंडित नलवडे,मोहन भंडरवार,राजेन्ना रौतोड,शिवाजी सोनकांबळे, बालाजी बुनोड,यादु रोन्टेवाड, न.प.चे.अधिक्षक तुंगेनवार,रूक्माजी भोगावार, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष साईनाथ गोरजे,संचालक शिवाजी पा.कदम, सुर्यकांत पाटील जुन्नीकर, लक्ष्मण पा.गुंडाळे,शेषराव पाटील, महेश शिवशेट्टे,माणिक पा.बन्नाळी ,देवराव पा.चोंडी,शंकर शिवशेट्टे,अशोक आरगे,धरमन्ना तोडापुरकर, शिवसेनेचे गणेश गिरी महाराज,साईनाथ पाटील चोळाखेकर, माजी.जि.प.सदस्य गंगाधर तोटलोड, संचालक दत्ताहारी पाटील आवरे पञकार लक्ष्मण पाटील येताळे, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गंगाधर धडेकर, माजी तालुकाध्यक्ष कृष्णा तिम्मापुरे,पोतन्ना लखमावाड, धर्माबाद पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबुराव पाटील आलुरकर, डॉ.लक्ष्मीनारायन केशटवार, नागनाथ माळगे, बालाजी बकावाड, अशोक येमेवार,पाडूरंग पाचांळ,पृथ्वीराज चाबुकस्वार ,गिरमाजी बाळापुरकर, रौऊफ भाई, लक्ष्मण कांबळे यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा