सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या 44 व्या जन्मदिन अभिष्टचिंतन
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या 44 व्या जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर आणि जिजाई ब्लड बँक तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली होती यामध्ये अनेक रुग्णांनी या शिबिरांचा लाभ घेतलेला आहे.
सद्गुरु श्री 108 ष.ब्र. सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या 44 व्या वाढदिवसाचे अवचिते साधून दत्ता सुभाषराव मेनकुदळे आणि श्याम सुभाषराव मेनकुदळे यांच्या नियोजनाखाली पाच जून 2023 रोजी रक्तदान शिबिर आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये कित्येक रुग्णांनी लाभ घेतलेला आहे तर डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दवाखाना विष्णुपुरी येथील लोटस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अपेक्षा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रेणुकाई क्रिटिकल व मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती.
या शिबिरामध्ये कॅन्सर मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार छाती दमा हृदयरोग हृदयावरील सर्जरी एसटी बँक जनरल मेडिसिन जनरल सर्जरी सांधा व फुफ्फुस आजारावरील उपचार जठर व आतडे शस्त्रक्रिया बालरोग शस्त्रक्रिया कान नाक घसा आजार दंतरोग आर्थोपेडिक सर्जरी दुर्बीण द्वारे पोटाची शस्त्रक्रिया स्त्रीरोग इत्यादी वैद्यकीय उपचार केले जातील या शिबिरामध्ये या सर्व आजाराची निदान केलेले आहे. मुखेड तालुक्यातील शिवलिंग बादशहा मठ संस्थान बेटमोगरा येथे आरोग्य शिबिर व्यवस्थापक भास्कर भानुदासराव डोईबळे आणि मेनकुदळे परिवाराच्या वतीने या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त या शिबिराचे आयोजन केले होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा