बोढार येथील सर्वात धक्कादायक घटना
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नांदेड जिल्ह्या शेजारील बोढार येथील सर्वात धक्कादायक घटना दिनांक 2 जून रोजी घडली. अक्षय भालेराव यांच्या सोबत वाद घालून निघून पणे हत्या करण्यात आली.सदर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आल्याने मनात राग बाळगत गावगुंडानी एकजुठ करून हत्येचा प्रकार घडवला. गावात जयंती का साजरी केली या उद्देशाने सनातनी विचारायच्या गावगुडानी अक्षय भालेरावचा कट रचून निर्घृण पणे हत्या करणयात आली व सात च्या सात आरोपी ना अटक करत फाशीची दयावी जलदगती न्यायालयात खटला दाखल करावा व कुटूंबाच्या एका व्यक्तीस शासकीय नौकरीत समाविष्ट करावे व तात्काळ अर्थिक मदत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेचा निषेध करत राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा ग्रामीण राजेंद्र कांबळे, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धम्मदिप कांडाळकर यांच्यासह घटनेचा तिव्र निषेध करत नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे याना निवेदन देऊन मारेकराना फाशी ची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली ,
यावेळी पत्रकार प्रकाशदादा हानमते, नगरसेवक प्रतिनिधि सुनिल सोनकांबळे, गंगाधर कोत्तेवार, नितीन देगांवकर, भुषण काळेवार, शिवाजी हवेलीवर, अविनाश गायकवाड अदिनी उपस्थित राहून घटनेचा निषेध करण्यात आला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा