व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर मध्ये योगा दिन साजरा करण्यात आला
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर
या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम "वसुधैव कुटुंबकम् साठी योग" म्हणजे "जग एक कुटुंब आहे."आजच्या धावपळीच्या युगामध्ये आरोग्य समतोल ठेवण्यासाठी योग ही काळाची गरज आहे असे म्हणत शाळेच्या मुख्याध्यापिका मिस पसक्वीन काशी यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व आणि माहिती सांगितली.
आजच्या या धावपळीच्या जीवनात माणूस हा आरोग्यापासून लांब होत चालला आहे.याच कारणांमुळे शाळेचे डायरेक्टर श्री. सुवालालजी पोखरणा आणि चेअरमन श्री. विकास पोखरणा यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तंदुरुस्त आणि सर्वांचे निरोगी आरोग्य व्हावे म्हणून *व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूरमध्ये रोज परिपाठ झाल्यानंतर* *सूर्यनमस्कार घेतला जातो.* कोरोना सारख्या महामारीने आपल्याला चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे एवढे तर नक्की झाले आहे की जर आपले शरीर निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. त्यासाठी आपले शरीर निरोगी असणे महत्त्वाचे आहे.त्यामुळेच आज शाळेमध्ये पहिली ते आठवी योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये मुलांनी योगासनाचे नाव, त्या योगासन विषयी माहिती आणि योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
योगाचे मुख्य सहा प्रकार पडतात.
*राजयोग*
*हठयोग*
*लययोग*
*ज्ञानयोग*
*कर्मयोग*
*भक्तियोग*
योगासन हे केवळ व्यायाम नाही. तर हे आपले शरीर आणि मन दोन्ही जोडण्याचे साधन आहे. खरे आरोग्य तेच ज्यामध्ये शरीरासोबत मनही निरोगी राहते. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची बुध्दिमत्ता हि विकसित होते.व्हिजन शाळेमध्ये आजचा योगदिन खूप आनंदात झाला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा