महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला
आरिफ शेख /सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी शिवशाही न्यूज..
दिनांक. 21/06/2023रोजी दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला त्या निमित्ताने योगा विषयी संपूर्ण माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विजय नागरे यांनी दिली.
जेष्ठ नागरीक श्री ज्ञानोबा मुंढे यांनी योगा कशासाठी केला जातो व योगा केल्याने कोण -कोणते फायदा होतात व शरीर आणि मन दोन्ही कशाप्रकारे सुदृढ होते हे प्रत्यक्ष कृतीतून प्रात्यक्षिक दाखविले यावेळी उपस्थित प्रा. आर पी मोरे, प्रा. शेख युनूस, प्रा. गजानन राठोड, श्री गजानन नागरे. सह शिक्षक ज्ञानेश्वर विद्यालय दुसरबिड श्री गजानन मुंढे अनिल गायकवाड, अनिल रणमळे व महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने डभाग नोंदवला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा