maharashtra day, workers day, shivshahi news,

वाघुंडे बुद्रूक हद्दीतील अलंकार कला केंद्र तत्काळ बंद करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर आक्रमक

वाघुंडे बुद्रूक हद्दीतील अलंकार कला केंद्र तत्काळ बंद करा

Regarding the closure of art center located in Waghunde Budruk area ,  Waghunde Budruk  , parner , shivshahi news.



शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी, सुदाम दरेकर पारनेर

वाघुंडे बुद्रूक हद्दीत असलेले कला केंद्र बंद करण्याबाबत गेल्या ६ महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी पूर्ण पाठपुरावा पुराव्यानिशी केला आहे. या  शेजारील ४,५ गावातली जमिनी एमआयडीसी मधे गेल्या आहे. येथिल काही तरुण वाम मार्गाला लागले आहेत. त्यामुळे हे अलंकार कलकेंद्र तत्काळ बंद करावे. या कलकेंद्र चालू करण्यासाठी कुठलाही ग्रामसभेचा ठराव घेतला नाही. 


त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी निवेदन दिले. त्यानंतर स्मरण पत्र जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वांना निवेदन दिले पण अद्याप पर्यन्त कुठलीही कारवाई केली नाही.जर या कलकेंद्रावर कायदेशिर कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल.   असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी दिला.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !