जनता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव शहरातील प्रसिद्ध असलेली जनता कनिष्ठ महाविद्यालयच्या भव्य मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला, यावेळी जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री के.जी. सूर्यवंशी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी नियमित योगासने करावे असे आवाहन केले.
प्रत्येक व्यक्ती लहान मोठ्या आजाराने त्रस्त आहे आणि आहार देखील पुरेशी नसल्याने प्रत्येक व्यक्तीचे शरीर कमकुवत बनत आहे त्यासाठी प्रत्येकाने सुदृढ व निरोगी राहण्यासाठी, उत्तमरीत्या जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने योगा करणे गरजेचे आहे असेही विद्यार्थ्यांना सदर शाळेची मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी आवाहन केले आहे.यावेळी योग शिक्षक प्रा. ज्ञानेश्वर बैस व योग शिक्षिका प्रा. सौ. राजश्री कदम यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे दिले. या कार्यक्रमात जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.पि,डी.व सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी योगासने केली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा