सद्गुरु नराशाम यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांनी व भाविकांनी एकच गर्दी
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती येथील जागृत देवस्थान सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थांनचे प्रमुख श्री सद्गुरु नराशाम महाराज यांचा 44 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. श्री सद्गुरु नराशाम महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविकांनी एकच गर्दी केली आहे.
मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती येथे श्री सद्गुरु नराशाम महाराज जागृत मठ संस्थान आहे. या संस्थांनचे मठाधिपती सद्गुरु नराशाम महाराज यांचा 44 वा वाढदिवस सद्गुरु सेवा समितीतर्फे नुकताच नांदेड येथे उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी सद्गुरु नराशाम महाराज यांची पाद्यपूजा, फळ तुला, ग्रंथ तुला, शर्करा तुला, पुष्परचना करण्यात आली आहे. यावेळी 21 सुहासिनी यांनी सद्गुरु नराशाम महाराज यांना औक्षवंत करून शुभेच्छा दिल्या आहेत. सद्गुरु सेवा वतीने यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरु नराशाम यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांनी व भाविकांनी एकच गर्दी केली आहे.
यावेळी नांदेडचे खासदार प्रतापराव पा. चिखलीकर, मुखेड मतदार संघाचे आमदार डॉ. तुषार राठोड, माजी जी.प. अध्यक्ष दिलीप पा. बेटमोगरेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबाराव एंबडवाड, मोहनराव पा. टाकळीकर, सौ. प्रणिता देवरे चिखलीकर, प्रकाश पा.,श्रावण पा.भिलवंडे, बाळू खोमणे, सुधीर पा. टाकळीकर, संतोष राठोड, व हेमंत भेंडे,भार्गव राजे, विशाल चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळू महाराज जोशी येवतीकर, दत्तात्रय पा. टाकळीकर, राजू पा. मोकासदरा, व्यंकट पदमवार, पांडुरंग पा टाकळीकर, संतोष महिंद्रकर मुखेड संतोष मोडेवार, चंद्रकांत काचमवार टेंभुर्णीकर, पत्रकार निळकंठ पा. जाधव तेजराव वचेवाड. देवराज पा. जाधव. दत्ता नागोराव पा. जाधव राम जाधव. कैलास जाधव . आदी सह अनेकांनी पुढाकार घेतला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा