डाॅ शारदा हिमगीरे मॅडम यांनी योगासनामुळे महीलांना होणारे अनेक फायदे सांगीतले
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी, शिवाजी कुंटूरकर
नांदेड जिल्हातील मुखेड येथील शिवप्रसाद ग्रुप आॅफ इन्स्टिट्युटच्या वतीने जागतीक योग दिन २१ जुन रोजी साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ.विरभद्र हिमगीरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन सहशिक्षक वडजे,झंपलवार सर,वर्षा जाधव मॅडम ,डाॅ शारदा हिमगीरे मॅडम ,हे उपस्तीत होते यावेळी सहशिक्षक वडजे यांनी योगासनामुळे होणारे अनेक फायदे सांगत विद्यार्थांना मार्गदर्शन केले. तर डाॅ शारदा हिमगीरे मॅडम यांनी योगासनामुळे महीलांना होणारे अनेक फायदे सांगीतले.
वर्षा जाधव यांनी कँन्सर सारख्या मोठ्या रोगावर योगासनाच्या मदतीने मात करत यावेळी अनेक विद्यार्थांना आपल्या दैनंदिन जिवनात योगासने करण्यास प्रोत्साहीत केले.यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले.योगदिनानिमित्त सर्व विद्यार्थांनी हजेरी लावली होती. .कार्यक्रमाचे सुञसंचलन अर्चना इंगोले मॅडम यांनी व शशिकांत कदम सर यांनी सांभाळले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा