सामाजिक कार्यकर्ते खाकेसाब चोपवाड यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
शिवशाही वृत्तसेवा,शिवाजी कंटूरकर नांदेड जिल्ह्य प्रतिनिधी
नायगाव तालुक्यातील कार्ला त.मा.माहेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या संरपंच पतीच्या यांच्या नावे असलेले घर हे नमुना ८ नंबर वर असलेल्या जागे पेक्षा ज्यास्त जागा आहे ते अतिक्रमण केलेले आहे,व संरपंच यांनी सरपंच पदाचा गैरवापर करून घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे,असा अर्ज सौ.सुवर्णा रामदास वडजे (ग्रा.पं.का.सदस्य कार्ला त.मा.माहेगाव ) यांनी करून संमधितांची चौकशी करून त्यांना सरपंच पदावरून अपात्र घोषित करण्यात यावे असा अर्ज दि.०८/०३/२०२३ रोजी अॅड कागडे यांच्या मार्फत.जिल्हाधिकारी नांदेड यांचे न्यायालयात ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल केलेला होता.
जिल्हाधिकारी यांनी दि.१२/०४/२०२३ रोजी काढून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६८ कलम १४ ( ज-३) व १६ नुसार व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ग ) १६ नुसार सदरील प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा आसे दोन पत्र मा.गटविकास अधिकारी पं.स.नायगाव यांना कळविण्यात आले त्या पत्राच्या अनुसंघाने दि.०६/०६/२०२३ रोजी सदरील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायगांव पं.स.कार्यालयाचे विस्तार अधिकारी कानोडे व उप अभियंता जिरवनकर हे जाऊन सदरील प्रकरणाची चौकशी
थातुर मातुर करून संमधितासी संघनमत करून चुकिचा अहवाल सादर करण्यात आला.त्यामुळे सदरील प्रकरणाची फेर चौकशी आपल्या स्तरावरून तात्काळ करण्यात यावे अन्यथा आपल्याच कार्यालयासमोर दि.०५/०७/२०२०रोजी अमरण उपोषणास बसण्यात येईल असे निवेदन कार्ला त.मा.माहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते खाकेसाब बाबुराव चोपवाड यांनी दि.२0/०६/२०२३ मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले आहे.
निवेदन कर्त्याचे निवेदनातुन असे म्हणणे आहे की,सरपंच यांच्या पतीच्या नावे आसलेल्या घराची ग्रामपंचायतीच्या नमुना नं.८ च्या नोंद नुसार मालमत्ता क्रमांक २९ वर मोकळी जागा दक्षिण-उत्तर ४०×१० व पर्व-पश्चिम १०×५० आहे व एकूण ९०० फुट आहे.व दिनांक ०६/०६/२०२३ रोजी च्या चौकशी च्या पंचनामा अहवाला मध्ये दक्षिण-उत्तर ५७फुट व पुर्व-पश्चिम ५१ फुट म्हणजेच एकूण २९०७फुट प्रत्यक्षात चौकशी अहवालात क्षेत्रफळ दिसुन आल्याचे ही उल्लेख केलेला आहे.आणी नमुना नंबर ८ वर एकूण क्षेत्रफळ ९०० फुट आहे म्हणजेच २००७ फुट अतिक्रमण असल्याचे शिध्द होत आहे.
मात्र चौकशी विस्तार अधिकारी कानोडे,उप अभियंता जिरवनकर यांनी शासनाची व निवेदन कर्त्याची दिशाभूल करण्यासाठी ५०×६० हे क्षेत्रफळ दर्शवून सरपंच पती यांचे घर त्यांच्याच क्षेत्रफळात असल्याचे दिसून येते यांनी गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याचे दिसून येत नाही असा जाणीवपूर्वक चुकिचा अहवाल सादर केलेला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ग) सरपंच यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून प्रधान मंत्री आवास योजनेच्या घरकुल योजनेचा लाभ घेण्यात येत आहे.तसेच सरपंच यांचे पती यांनी घरकुल बांधकाम करण्याच्या अगोदरच त्याच गावातील दुसऱ्या व्यक्तीचे असलेल्या बेसमेंट केलेल्या बेसमेंट वर थांबून फोटो काढून शासनाची दिशाभूल करून दोन वेळेस चे मिळून ७०,००० हजार रुपयांची बोगस बिले काढून घेतली आहे.व सरपंच यांचा एक नंबर चा मुलगा हा त्यांच्या राशन कार्ड मधून तो विभक्त असून त्यांचा राशन कार्ड वेगळा आहे.
व संरपंच व सरपंच पती आणी त्यांचा दोन नंबर चा मुलगा एकत्रीत कंटूबातील आहेत व हाच मुलगा शासकीय नौकरीला आहे तो मुलगा विभक्त नसून एकत्रीत कंटूबातील आहेत मात्र अर्जदाराची व शासनाची दिशाभूल करण्यासाठी सरपंच पद जाण्याच्या भितीने सरपंच यांनी आमच्या कंटूबातील कोणताही व्यक्ती शासकीय नौकरीत नाही म्हणुन स्वयंघोषित प्रमाण पत्र लेखी लिहून दिले आहे व त्यांचा मुलगा शासकीय नौकरीत असल्यामुळे त्यांना कोणत्याही शासकिय योजनेचा लाभ घेता येत नाही म्हणुन त्यानी आजपर्यंत जाणीवपूर्वक राशन कार्ड तयार करून घेतले नव्हते.व नायगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील कार्यालयात यांच्या नावाची आर सी .ला नोंद नसतानाही दोनच व्यक्तींनचे या महिन्यात ०१ जुन २०२३ रोजी आर सी.ला नोंद करून दि.०२ जुन २०२३ राशन कार्ड काढून घेतले.
शासनाची व अर्जदाराची दिशाभूल करण्यासाठी दोनच व्यक्तींचे नवीन राशन कार्ड तयार करून घेतलेले असतानाही सदरील चौकशी प्रकरणातील वरीष्ठ असलेले अधिकारी गटविकास अधिकारी ,चौकशी अधिकारी विस्तार अधिकारी कानोडे,उप अभियंता जिरवनकर यांनी संरपंच पती यांच्याशी संगणमत करून लाचलुचपत घेऊन.जिल्हाधिकारी यांना चुकिचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे सदरील प्रकरणाची फेर चौकशी करून चुकिचा माहिती अहवाल सादर करण्यावर कार्यवाही करून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा आपल्याच कार्यालयासमोर दि.०५/०७/२०२३ रोजी अमरण उपोषणास बसण्यात येईल असा उल्लेख केलेले निवेदन दि. २0/०६/२०२३रोजी सामाजिक कार्यकर्ते खाकेसाब चोपवाड यांनी .जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन दिले आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा