नूतन तहसीलदार मंजुषा भगत यांचा युवासेना ठाकरे गटाच्या वतीने सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तहसील कार्यालयातील तत्कालीन तहसीलदार गजानन शिंदे यांची बदली झाल्यानंतर नूतन तहसीलदार म्हणुन मंजुषा भगत यांनी पदभार स्वीकारल्यामुळे त्यांच्याकडून नायगाव तालुक्यातील लोकांची पारदर्शक कामे व्हावी या उद्देशाने युवा सेना नायगाव तालुका ठाकरे गटाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे.
युवा सेना नायगाव तालुका प्रमुख शिवाजी कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली नूतन तहसीलदार मंजुषा भगत यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी कार्यास शुभेच्छा ही देण्यात आलेल्या वेळी नायगाव तलाठी संघटनेची अध्यक्ष श्याम मुंडे, अव्वलकारकून लक्ष्मण टेकाळे, शिवाजी पांचाळ तळणीकर, कुमारी मयुरी माधव यमलवाड, कुमारी ममता माधव यमलवाड यांची प्रमुख्याने उपस्थिती होती.
आपल्या सत्कारास मी पात्र राहील असे नूतन तहसीलदार मंजुषा भगत यांनी सत्कार स्वीकारल्यानंतर उपस्थिताना आपल्या भावना व्यक्त केले आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा