इकळीमाळ येथील पाणीपुरवठा योजनेचे काम बोगस
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील मौजे ईकळीमाळ ग्रामपंचायत मधील पाणीपुरवठा व जलजीवन योजनेअंतर्गत सुरुवात असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून त्याची पाहणी व योग्य ती चौकशी केल्याशिवाय बिले काढण्यात येऊ नये अशी तक्रार उपविभागीय अभियंता यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते प्रलाद शिळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शासन पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत असले तरी सबंधित गुत्तेदारामार्फत होणारे काम हे अतिशय बोगस आणि थातूरमातूर पद्धतीचे होत असल्याने जलजीवण योजनेअंतर्गत सदर काम चालू असून या कामाच्या शासनाच्या आराखडा प्रमाणे काम केले जावे अशी मागणी केली जात आहे. सदर पाईपलाईन हे सरळीकरण नसून ते नागमोडी वाकडी तिकडे याप्रमाणे होत असताना विहिरीचे बांधकाम देखील बोगस होत आहे आपल्या स्तरावरून योग्य ती जाय मोक्यावर जाऊन पाहणे करावी त्याची योग्य ती चौकशी करून केल्याशिवाय बिले अदा करू नये अशी तक्रार उपविभागीय अभियंता यांच्याकडे इकळी माळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा