नारायण गव्हाण चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यास अपघातांना मोठा आळा बसेल
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी सदाम दरेकर पारनेर
नगर पुणे महामार्गासह रखडलेल्या नारायण गव्हाण चौपदरीकरणाच्या कामामुळे सतत होणारे अपघात नियंत्रणात येण्यासाठी ग्रामस्थांसह अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न मोलाचे असून रखडलेले चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी केले.
राळेगणसिद्धी ता. पारनेर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांची ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब साहेब हजारे यांच्या समवेत बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.
नगर पुणे महामार्गावरील नारायण गव्हाण येथील रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे प्रवाशांसह ग्रामस्थांनाही मोठा धोका निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी सतत घडणारे अपघात थांबवण्यासाठी ग्रामस्थांसह विविध समाजिक संघटनांनी शासन दरबारी पाठपुरावा केला त्यामुळे काम अंतिम टप्यात आले असून गावातील राहिलेल्या उर्वरित रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली असून काम अंतिम टप्यात आले .
असून गावात राहिलेल्या उर्वरित रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी भूमी अभिलेख यांच्याकडून मोजणीच्या दराचे पत्र उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग अहमदनगर यांना प्राप्त झाले असून लवकरच भूसंपादन करून चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी ,ग्रामस्थांना जागेचा योग्य मोबदला मिळणार असून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची राळेगणसिद्धी येथे बैठक पार पडली यावेळी अधिकाऱ्यांनी अण्णासाहेब हजारे यांना कामाच्या स्वरूपाची पाठपुराव्याची माहिती यावेळी दिली यावेळी अण्णासाहेब हजारे यांनी ग्रामस्थांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काम तातडीने पूर्ण करा असे सांगितले.
यावेळी विविध विषयांवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंता संजय भावसार साहेब अहमदनगर सिव्हिल इंजिनिअर गोकुळ घोडके साहेब ,चेतक एंटरप्राईजेस चे भडके साहेब सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे संबंधीत विभागाच्या अधिकार्यांचे आभार व्यक्त केले व नारायणगव्हाण ग्रामस्थांना जागेचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असुन रस्त्याच्या कामामुळे गावाचा विकास होईल तुरुणांना याठिकाणी व्यवसाय उभे करता येतील नारायणगव्हाण अपघातमुक्त होईल यासाठी गावाच्या उज्वल भविष्यासाठी ग्रामस्थांचा रस्त्याच्या कामाला मोठा सहयोग होईल असे प्रसिद्धि माध्यमांशी बोलताना सांगितले.
वैयक्तिक रित्या लक्ष घालून काम पूर्ण करू मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे येणाऱ्या काही दिवसात भूसंपादन करून संबंधितांना जागेचा मोबदला वाटप करून चौपदरीकरणाचे काम पूर्ण करणार~ सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता संजय भावसार
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा