श्री सिद्धनाथ विद्यालय सातवा मैल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
शिवशाही वृत्तसेवा,खर्डी जिल्हा प्रतिनिधी कासेगाव
तालुका पंढरपूर येथील श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित श्री सिद्धनाथ विद्यालय सातवा मैल कासेगाव येथील एस.एस सी परीक्षा 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रशालेचा एकूण निकाल ८६.९५% असून प्रथम क्रमांक कु. शिफा जावेद शेख 87.४० द्वितीय क्रमांक कू. प्रणाली देविदास घायाळ ८५.६०तृतीय क्रमांक कु. वैष्णवी धनंजय राऊत 84 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने शाल श्रीफळ गुलाब पुष्प व बक्षीस देऊन प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंद परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमित देशमुख होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक जयंत अयाचीत यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुरेशभैया देशमुख, महादेव भोसले, सचिन घायाळ, धनंजय राऊत,जावेद शेख यांच्यासह शिक्षक, सिकंदर पटेल, अजय पवार, शिक्षिका,स्वप्नाली रोंगे,पिंकी डांगे, हौसाबाई खताळ शिक्षकेतर कर्मचारी भारत मासाळ, शंकर चौगुले,किसन बनसोडे,संजय पळसे , यांच्यासह पालक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर झांबरे व आभार सदाशिव मोटे यांनी मांडले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा