संत रविदास सामाजिक सभागृहासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी रईस शेख सोयगाव तालुका.
शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील नर्सरी परिसर येथे नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या संत रविदास सामाजिक सभागृह बांधकामाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते संपन्न झाले.
सिल्लोड शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील नर्सरी परिसर येथे नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या संत रविदास सामाजिक सभागृह बांधकामाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम होत्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने संत रविदास सामाजिक सभागृहासाठी 25 लाखरुपयांचा निधी मंजूर झालेला असून सदरील सभागृह दोन मजली व्हावे तसेच यासाठी आणखी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नगरपंचायतच्या सर्वसाधारण बैठकीत निर्णय घेणार असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले. याप्रसंगी नगरपंचायतील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, मालतीताई रतनकुमार डोभाळ, नगरसेवक शंकरराव खांडवे, व नगरपंचायत कर्मचारी यांच्यासह परिसरातील महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा