22 अग्निशमन वाहनाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
शिवशाही वृत्तसेवा, पुणे (जिल्हा प्रतिनीधी अभिषेक जाधव)
मागील काही दिवसांपासून पुण्यात आगीचे सत्र सुरूच आहे. नुकतेच कोंढव्याजवळील गंगाधाम परिसरातील आईमाता मंदिराजवळ आगीची घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अशा एकुण 22 अग्निशमन वाहने आग नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र ही आग भीषण स्वरूपाची असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दूरपर्यंत पसरले आहेत.
आईमाता मंदिराजवळ सुमारे 20 विविध साहित्याचे गोडाउन आगीमध्ये जळून खाक झाले आहेत. यात बिस्कीट, सिमेंट, मोल्डिंग साहित्य यासारखे सामान होते. याशिवाय शेजारी मांडवाचे सामान ही पेटले आहे. या परिसरात रहिवासी लोकांची गर्दी आहे. त्यामुळे या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा