पोलिसांच्या सतर्केमुळे अनर्थ टळला
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख आकाशरेड्डी येताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानात दि: १७ जून रोजी प्रसिद्ध कलावंत गौतमी पाटिल यांचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता, नियोजित वेळेपेक्षां दोन ते आडीच तास विलंबाने हा कार्यक्रम सुरू झाला. गौत्तमी पाटील स्टेजवर येताच शौकीनाची हुल्लडबाजी सुरू झाली त्यामुळे केवळ दहा मिनीटात हा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. यावेळी महिला, पुरुषासह युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.१५ हजारांपेक्षा अधिक प्रेक्षक असल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने वेळीच आक्रमक भूमिका घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
गौतमी पाटिल हे सध्या राज्यभरात प्रसिद्ध झाले आहेत त्यांचा जिल्हयातील ग्रामीण भागात होणारा धर्माबाद येथिल कार्यक्रम पहिलाच होता . प्रत्यक्ष कार्यक्रम पाहता यावा म्हणून अनेक प्रेक्षक आले होते .तसेच काही आंबट शौकीन देखील आले होते. कार्यक्रमाची नियोजित वेळ सात वाजताची होती मात्र गौतमी पाटिल विलंबाने आल्यामुळे कार्यक्रम सुमारे साडे नऊ वाजता सुरू झाला.
पहिले गाणे संपताच आंबट शौकीनानी हुलड घालण्यास सुरुवात केली तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला . हुल्लड बाजीचा ज्वर वाढल्याने गौतमी पाटिल यांनी कार्यक्रम न करण्याची भूमिका घेतली.आणि ही बाब आंबट शौकिनांच्या लक्षात येताच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला गेला पण वेळीच प्रसंगावधान राखून पोलीस प्रशासनाने आंबट शौकीनांचा बंदोबस्त केला त्यामुळें परिस्थीती नियंत्रणात आली. कार्यक्रमात व्यत्यय आला असल्याने केवळ दहा मिनीटात हा कार्यक्रम संपुष्टात आला त्यामुळें मोठ्या हौसेने आलेल्यांचा पुरता भ्रम निरास झाला आहे.
आंबट शौकीन मंडळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करीत होती त्यापैकीच काहीजण वाद देखील घालीत होते. ही बाब लक्षात येताच परिस्थिती निवारण्यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत सकारात्मक भूमिका घेतली असल्याने कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा