दाढीवरून हात फिरवत भगीरथ दादांनी मारली भारतनानांची स्टाईल
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल हाती आला आणि विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त केला, त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि प्रचंड मोठी विजयी मिरवणूक निघाली. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी ही मिरवणूक शिवतीर्थावर आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सर्व नेते अभिवादन करण्यासाठी गेले तेव्हा असणारे भगीरथ भालके यांना पाहून उपस्थित कार्यकर्त्यांना नानांची आठवण झाली त्याचबरोबर भगीरथ दादांनाही नानांच्या आठवणीने काहीसे गहिवरून आल्याचे दिसले.
कारण भारत नाना जेव्हा निवडणुकीत विजय मिळवायचे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या ऊसाला प्रतिसाद देत दाढीवरून हात फिरवायचे आणि दंड थोपटायचे या शिवतीर्थावर कार्यकर्त्यांनी अनेकदा हा प्रसंग पाहिला अगदी तसाच प्रसंग काल आला होता . योगायोगाने काल फादर्स डे असल्याने भगीरथ दादांनी जेव्हा शिवतीर्थावर नानांच्या स्टाईल मध्ये दाढीवरून हात फिरवला तेव्हा समोर उपस्थित जनसागराला अक्षरशः उत्साहाची भरती आली होती. कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून, आणि फादर डे निमित्त नानांच्या आठवणीने काही क्षण भगीरथ दादांच्या पापण्या ओलावल्या होत्या. यावरून कार्यकर्त्यांचे भारत नानांवर किती प्रेम होते हे दिसून आले. तसेच फादर्स डे च्या निमित्ताने भगीरथ दादांनी एक विजय भारत नानांना भेट दिला असेही काही कार्यकर्त्ये एकमेकांना सांगत होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा