होणारा रस्ता एकूण पाच लाख रुपयाचा असतानाही त्याप्रमाणे रस्त्याची काम होत नाही
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील मौजे गोधमगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत कडून सीसी रस्त्याचे एकूण आमदार निधीतील 90 मीटर रस्ता बांधकाम चालू असून त्या कामाचे अतिशय निकृष्टपणा दर्जाचे काम चालू असल्याने त्याची रीतसर तक्रार मारुती बाबाराव भागानगरे यांनी दिलेली आहे तर त्यांना माझ्या विरोधात तक्रार का केलेली आहेस म्हणून भागानगरे यांच्या घरात शिरूर मारहाण करण्याचा प्रयत्न व जीवे मारण्याची धमकी सरपंच प्रतिनिधी रामराव महाजन पल्लेवाड यांनी दिलेली आहे. सदर रस्ता हा आमदार निधीतून बांधकाम विभाग अंतर्गत चालू असून रस्ता चांगला दर्जाचा व मजबूत व्हावा म्हणून भागानगरे यांनी तक्रार केलेली आहे.
याबाबत इंजिनियर मुखेडकर आणि गुत्तेदार राहुल पाटील यांच्याकडून काम चालू असताना गावातील सरपंच प्रतिनिधी रामराव महाजन पल्लेवाड यांनी तक्रारदाराना मारहाण करण्याचा प्रयत्न व जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गावातील नागरिक हरिश्चंद्र किशनराव शिंदे मालोजी लक्ष्मण शिंदे माधव मारुती टाकळे यांनी आमच्या गावातील रस्ता चांगला दर्जाचा व्हावा, हा होणारा रस्ता एकूण पाच लाख रुपयाचा असतानाही त्याप्रमाणे रस्त्याची काम होत नाही म्हणून आम्ही तक्रार करीत आहोत, निकृष्ट दर्जांचे काम थांबवावे आणि मजबुतीकरण चांगल्या पद्धतीने रस्त्याची झाले पाहिजेत अशाही भावना प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहेत.
-------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा