रुई बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील रहिवासी असलेले सैनिक भास्कर गंगाधरराव गोरठकर यांच्या मातोश्री स्व. मंजुळाबाई गंगाधरराव गोरठकर यांच्या दिनांक १४ मे २०२३ रोजीच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने संदीप महाराज खंडागळे यांच्या भव्य कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
रुई बु येथे सैनिकांचा सत्कार सोहळा सैनिक भास्कर गोरठकर यांच्यासह सुभाष गंगाधरराव गोरठकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटागंणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला कैलास देशमुख गोरठेकर, नायगाव विधानसभेचे युवा नेते गजानन चव्हाण, कवळे गुरुजी, भास्करराव भिलंवडे, गजानन रामराव तमलुरे आदी यावेळी उपस्थित होते .
तालुक्यातील रुई बु नगरीच्या जेष्ठ महिला तथा सैनिकाची मातोश्री स्व. मंजुळाबाई गंगाधरराव गोरठकर यांचे गेल्या वर्षी दुःखत निधन झाले होते त्या निमित्ताने सैनिक भास्कर गंगाधरराव गोरठकर व सुभाष गंगाधरराव गोरठकर यांनी प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तन सोहळ्या बरोबर सैनिकांचा भव्य सत्काराचे आयोजन केले आहे
रुई बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने संदीप महाराज खंडागळे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे लाडके हरिओम बाबा महाराज श्री क्षेत्र सिद्धेशवर संस्थान रुई बु त्याच बरोबर आदी गावातील जेष्ठ व प्रतिष्ठित मंडळीसह सैनिक आणि गावाच्या महिला वर्ग मोठ्या संख्येने कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आलेला कीर्तन सोहळा व सैनिकांचा सत्कार समारंभ हा सैनिक भास्कर गंगाधरराव गोरठकर व सुभाष गोरठकर यांच्या मातोश्री स्व मंजुळाबाई गोरठकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त प्रथमच सदरच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन रुई बु येथे करण्यत आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा