आजच्या तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन प्रयत्नवादी बनावे
शिवशाही वृत्तसेवा, परभणी प्रतिनिधी बाळासाहेब घिके
परभणी येथील उघडा महादेव परिसरात आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त जाहीर व्याख्यान व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि आजचा युवक या विषयावर बोलत असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे जिवनचरित्र मांडताना संभाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे अनेक भाषांचे ज्ञान, संस्कृत भाषेवर असलेली पकड, आलेल्या अंतर्गत फितुरी व अनेक संकटांवर मात करत अजिंक्य राहिलेले संभाजी महाराज अशा विविध विषयावर तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी बाल व्याखाती अरोही खंदारे हिने विचार व्यक्त केले तर उदघाटक अजय गव्हाणे, तर अध्यक्ष म्हणून मेंदु विकार तज्ञ डॉ दत्तात्रय किरडे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एन आय काळे, दिलीप मोरे, वकील संघाचे अध्यक्ष बी. टी. पौळ, नरहरी वाघ,सुभाष ढगे , कृ.बा.समिती संचालक सुरेश भुमरे,बी एम जाधव, सुरेश चव्हाण,नितीन देशमुख हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख, महानगर अध्यक्ष गजानन जोगदंड जिल्हाप्रमुख बालाजी मोहिते,बालाजी जावळे,प्रीतम पैठणकर,शिवाजी तोलमारे स्वप्नील गरुड,वाघ साहेब, नरसाळे साहेब,मराठा सेवा मंडळ अध्यक्ष मंगेश भरकड, गोविंद इक्कर,अमोल अवकाले,प्रलाह राठोड, तुकाराम सावंत,अंगद मस्के, राजाभाऊ येटेवड,सिद्धार्थ उघडे, यांनी परिश्रम घेतले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा