पोलीस येताच वाळू माफिया पळून गेले
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटुर परिसरामधील मौजे धनंज येथे दोन ठीकानी वाळु उपसा रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर व बोटी लावून जोरदार रेती उपसा करून विक्री केली जात होती. पोलीसांना माहिती मिळाली पोलीसांनी रात्री उशिरा नदी परिसरात जावुन रेती अवैधरित्या चोरी करणाऱ्यास पकडले.
अवैधरित्या वाळू धनंज येथील काही नागरिकांनी सुरू केला होता . दोन ठिकाणी रात्रभर रेती उत्खनन घोडी काटे साह्याने ट्रॅक्टरवर बसून नदी मधून वाहतूक करून बाहेर काढून सदर ट्रॅक्टर साह्याने परिसरामध्ये विक्री केले जात होते.
राहेर बिटचे विश्वंभर निकम पोलिस बिट प्रमुख यांना माहिती मिळाली. रात्रीच्या वेळी साडेबारा वाजता धनंज नदिवर रात्रीच्या वेळी वाहतूक करत असताना नदीतून काढत असताना ट्रॅक्टर मिळून आले .
तर दुसऱ्या पॉईंट वरिल ट्रॅक्टर पसार झाले . त्यामुळे दोन ठिकाणी वाळू उपसा जोरदार सुरू होता मात्र एक सापडल्याने एकावर कारवाई करण्यासाठी रात्रभर मशीन जवळ पोलीस बीड प्रमुख विश्वबर निकम यांनी रात्र काढले. सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन सदर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे कुंटूर परिसरामध्ये रेती उपसा करणारे अवैध वाहतूक करत असून तहसीलदार व मंडळ अधिकारी यांची दुर्लक्ष होत आहे.
या परिसरात रेती उत्खनन होतच नाही असे बिनधास्तपणे तलाठी व मंडळ अधिकारी हे तहसीलदार यांना सांगतात मात्र पोलिसांनी रात्रभर जागून अशा रेती चोरांना रंगेहात पकडल्याने महसूल विभागातील अधिकारी व तहसीलदार कारवाई करण्यास ध्वजावत नसल्याने नागरिकांत वेगळी चर्चा केली जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा