maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपूर शहरातील बंद पडलेले प्रधानमंत्री आवास योजनेचे काम त्वरित सुरू करून लाभार्थ्याना घरे देऊ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मनसे नेते दिलीप धोत्रे यांना दिले आश्वासन
PM awas yojana, cm eknath shinde, mns, raj thakarey, dilip dhotre, pandharpur, solapur, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर शहरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत दोन हजार घरे मंजूर झालेले आहेत, गेल्या तीन वर्षांपूर्वी पंढरपूर नगरपालिकेने यासंदर्भात वर्तमानपत्रांमधून जाहिरात देऊन  गोरगरीब गरजू  लोकांना घरे पाहिजेत त्यांनी आपले नाव नोंदवून पैसे भरा असे सांगितले होते .
नगरपालिकेवर विश्वास ठेवून पंढरपूर शहरातील अनेक गोरगरीब लोकांनी बँकेकडून कर्ज काढून खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन ,घरातील सोन  विकून आपल्या कष्टाचे पैसे स्वतःला राहायला घर मिळेल म्हणून भरले होते .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशामध्ये एकही नागरिक बेघर राहणार नाही प्रत्येकाला स्वतःच हक्काचं घर असेल अशी घोषणा केली होती .
त्यामुळे संपूर्ण देशांमध्ये ही योजना अस्तित्वात आली परंतु पंढरपूर मध्ये पैसे भरून देखील लोकांना घरे मिळत नाही ज्या ठेकेदाराला काम दिले होते तो ठेकेदार काम अर्धवट सोडून निघून गेलेला आहे. ज्या गोरगरीब लोकांनी नगरपालिकेकडे पैसे भरलेले आहेत ते लोक रोज नगरपालिकेत हेलपाटे घालतात पण  नगरपालिका प्रशासन कसल्याही प्रकारची कार्यवाही करत नाही. नगरपालिकेला वारंवार पत्रे, निवेदन देऊन देखील याकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे .हा प्रकल्प जाणून-बुजून बंद पाडण्यात आला असून तो कोणत्यातरी पुढाऱ्याच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालू आहे. 
सर्व गोरगरिबांना न्याय देण्यासाठी त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक दिवस झालं प्रयत्न चालू आहेत. मुंबई येथे गृहनिर्माण सहकारी संस्थांची सहकार परिषद आयोजित केली होती या सहकार परिषदेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हजर होते. त्यावेळी पंढरपूर शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील सर्व लाभार्थ्यांना त्वरित घरे मिळावीत आणि बंद पडलेल्या काम त्वरित चालू करण्यासंदर्भात आदेश व्हावेत असे  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज साहेब ठाकरे यांचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिले. 
पंढरपूर शहरातील बंद पडलेली प्रधानमंत्री आवास योजना त्वरित सुरू करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत आणि ज्या ज्या लाभार्थ्यांनी पैसे भरलेले आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना घरे मिळावेत अशी मागणी मागणी एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे  केली .मुख्यमंत्र्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देऊन या विषयावर मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्याकडून  सखोल माहिती घेतली आणि ताबडतोब याच्यावर उचित कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले .यावेळी भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आणि खासदार गोपाळ शेट्टी, हाउसिंग फेडरेशनचे चेअरमन प्रकाश दरेकर इत्यादी उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !