मंगळवेढा पोलीसांची यशस्वी कामगिरी - पो.नि. रणजीत माने
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी राज सारवडे)
दि.21 फेबु्रवारी रोजी तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर यात्रेतून सायंकाळी पार्कींग केलेली एम.एच.13 बी.सी.1716 ही मोटर सायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती माचणूर येथील सी.सी.टी.व्ही.फुटेज चेक करुन तपास केला असता ब्रम्हपुरी चौकात एक इसम मोटर सायकलसह असल्याची माहिती प्राप्त झाली.
पोलीसांनी तेथे जावून इसराईल मुजावर (वय 22 रा.बेगमपूर ता.मोहोळ) याला ताब्यात घेवून चौकशी केली असता आणखीन दोन गाड्या चोरी केल्याचे त्याने कबूल केले. दोन मोटर सायकली या बिगर नंबरच्या असून त्यावर खाडाखोड केलेली आहे. सदर गाडीचा अभिलेख पडताळून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दि. 13 एप्रिल रोजी एस.टी.स्टँड आवारातून एम.एच.13 बी.एस.6793 ही गाडी चोरीला गेली होती. शहरात पोलीस पेेट्रोलींग करत असताना एक इसम संशयीतरित्या मोटर सायकल रस्त्याच्याबाजूला लावून बसलेला दिसल्यावर पोलीसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव राहुल प्रविण माने (वय20 रा.चिचुंबे) असे सांगितले.
गाडीच्या कागदपत्राची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी अधिक खोलवर जावून चौकशी केल्यावर त्याने एस.टी.स्टँड येथून मोटर सायकल चोरल्याची कबूली दिली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा