ताकबीड येथे बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबीर
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव : बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी करण्यासाठी शासनाने मोहीम हाती घेतली असून. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून नायगाव तालुक्यातील ताकबीड येथे बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.यावेळी ६० बांधकाम कामगारांची तपासणी करण्यात आली.
बांधकाम कामगार कल्याण विभागातर्फे नोंदणीकृत कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयाची मोफत आरोग्य तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून. नायगाव तालुक्यातील कामागारांची तपासणी करण्यात येत आहे.महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय ताकबीड येथे लँब टेक्नेशियन लक्ष्मी पांचाळ व त्यांचे सहकारी सय्यद अनिसा यांनी उपस्थित राहून जवळपास ६० कामगारांच्या आरोग्याची तपासणी केली.
यातील अनेकांचे ब्लँड सॅम्पल घेतले असून. कामगारांचे घेतलेले ब्लँड सॅम्पल हे तपासणीसाठी मुखेड येथील हिंद लँब येते पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली.बांधकाम साइटवर काम करणाऱ्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढील काळात या योजनेअंतर्गत कामगारांची आरोग्य तपासणी, त्यांच्या मुलांना लसीकरण, राष्ट्रीय कीटकजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण, बालकांची जन्म नोंदणी आदींचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर ब्लडप्रेशर, ब्लड शुगर चाचणी, कान तपासणी, डोळे तपासणी, रक्त तपासणी, मूत्रपिंड चाचणी, सीबीसी, थायरॉईड, किडनी, लिव्हर, बिपी, मलेरिया अशा विविध मोफत आरोग्य तपासणी केल्या जाणार आहेत.
बांधकाम कामगाराची आरोग्य शिबिर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला घेण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व बांधकाम कामगारांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावे असे आव्हान तालुका व्यवस्थापक (ASSK) प्रकाश महिपाळे पंचायत समिती नायगाव व हिंदलॅब मुखेडच्या वतीने करण्यात आले आहे.
आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी सरपंच प्रतिनिधी रणजित कुरे, उपसरपंच प्र. उमाकांत कुरे, ग्रामसेवक यरसनवाड साहेब, ऑपरेटर रामकृष्ण मोरे, रोजगार सेवक पंढरी इंगळे, निळकंठ ताकबीडकर, शिवराज इंगळे, संभाजी पांचाळ,गंगाधर मंडलापुरे, गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा