जोरदार वारा व पावसामुळे झाले शेतकऱ्याच्या सोलार नुकसान
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील घुगंराळा ,वंजारवाडी ,कहाळा कृषणुर परिसरामध्ये 27 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपासून जोरदार वारा व गाराच्या पावसामुळे झाडे उपटुन पडली आहे जोरदार गारामुळे जनजीवन विस्कळीत झाले . तसेच वाऱ्यामुळे सोलार पंप बसवलेल्या शेतकऱ्याने सदरचे सोलार पंप फुटून साईटला पडल्यामुळे सदर लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
शेतकरी गजानन नागोराव हेडगे, जळबा दत्तराम शिंदे, रुक्मिणीबाई पुंडाजी शिंदे रा. कहाळा खु ता. नायगाव . जि. नांदेड या शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान झाले. असून शासनाने भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी सदर शेतकऱ्यांनी केली आहे . त्यामुळे लाखो रुपये खर्च करून सोलार पंप बसून शेतीला पाणी देऊन उत्पन्न काढण्यासाठी शेतकऱ्यांनी विकत घेणारे सोलार नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत असून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली .
सर्वत्र अवकाळी पावसाचा गारा वारा यामुळे शेतकऱ्याच्या विविध पिकाचे व शेतीच्या अवजाराची प्रचंड नुकसान होत असल्याने त्याचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे असे शेतकऱ्यातून मागणी पुढे येत आहे.
.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा