जिंतूर कृषि उत्पन्न बाजार समितीचा दणदणीत विजय
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब घिके परभणी
जिंतूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने स्पष्ट असे बहुमत प्राप्त केले आहे. या बाजार समितीत बोर्डीकर गटाने 18 जागा पैकी 14 जागा पटकावल्या असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले.
आज सकाळी मत मोजणीच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांसह त्यांचे समर्थक मतमोजणी केंद्रासमोर मोठ्या संख्येने जमा झाले होते. हळूहळू मतमोजणीचा निकाल बाहेर येवू लागला तेव्हा या निवडणूकीत बोर्डीकर गटाने स्पष्ट बहुमत मिळवेल, असे चित्र निर्माण झाले. त्याप्रमाणेच अंतीम टप्प्यात निकाल जाहीर झाले.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा