maharashtra day, workers day, shivshahi news,

नायगाव तालुक्यात अवकाळी पाऊस गारा मुळे नुकसान झालेल्या शेताचे तात्काळ पंचनामे करा.प्रा रवींद्र पाटील चव्हाण

अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले 

In Naigaon Taluk Damage due to unseasonal rain and hail, Prof. Ravindra Patil Chavan, naigaon, nanded,shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर 

तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून अचानक अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी रस्त्यावर झाडे  पडली तर अनेकांच्या घरावरची  पत्रे उडून गेली त्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले व अवकाळी पाऊसाच्या गारपिटीचा फटका सर्वसामान्य माणसांना बसला असल्याने त्यांच्या शेताची व पडझड झाल्या घराची त्वरित पंचनामे करावे अशी मागणी युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी केली आहे.

 दि 25 एप्रिल दुपारी दोन वाजल्यापासून अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावून त्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला नायगाव तालुक्यातील अनेक गावांत जोरदार गारपीट झाली या वादळी वाऱ्यामुळे काही भागातील झाडे तुटून रस्त्यावर पडली तर गोरगरिबांच्या घरावरील टीन पत्रे उडून त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे,  वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिकासह आंबा, कांदा हळद उन्हाळी सोयाबीन या रब्बी पिकांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सध्या हळद काढणीचा मोसम सुरू असून बहुतेक भागात हळद शिजवण्याचे काम सुरू आहे या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची हळद भिजून तिचे नुकसान झाले आहे अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्या सह पाऊसाने सर्व शेतकऱ्यांची तारांबळ उडाली त्याचे शासनाने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी केली आहे. 

तहसीलदार गजानन शिंदे यांना निवेदन देण्यात आलेल्या वेळी  युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष  माणिक चव्हाण,  संजय पाटील चव्हाण, नगरसेवक प्र विठ्ठल बेळगे, नगरसेवक बंटी पाटील शिंदे, शहराध्यक्ष युवक काँग्रेस साईनाथ चनावार, शहराध्यक्ष ओबीसी सेल काँग्रेस गजानन चौधरी, पंडित पाटील सुगावे, देवदास पा. सुगावे, बालाजी पा. शिंदे, नवनाथ पाटील जाधव, चंद्रकांत आईलवार, बालाजी धोते, अभिजीत मंगरुळे,  सुमित जाधव, अतुल मंगरुळे, हनुमंत जकले, अविनाश मोहिते, सुनील शेळगावकर, पवन पटणे, राहुल शेळके, बजरंग कदम व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !