बजरंग दल ही एक राष्ट्राभिमानी संघटना
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
बजरंग दल ही एक राष्ट्राभिमानी संघटना देशातील विविध धार्मिक व सामाजिक विषयांवर सातत्याने लढा देत असते, समाजातील युवकांमध्ये धर्माप्रती व देशाप्रती सकारात्मक भावना निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते तसेच देशातील गंभीर मुद्द्यांवर ‘एक विना वर्दीचा‘ पोलीस म्हणून प्रशासनाच्या सोबत निस्वार्थ भावनेने कार्य करणारी संघटना म्हणून ओळखली जाते, याच संघटनेला काँगेस पक्ष त्यांच्या कर्नाटक निवडणुकीतील जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे नमूद करतो.
तसेच पीएफआय सारख्या कुख्यात राष्ट्रविरोधी, देशविघातक संघटनसोबत बजरंग दलासारख्या राष्ट्राभिमानी संघटनेची तुलना करून समाजात तेढ निर्माण करतो यामुळे बजरंग दलाची समाजात बदनामी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे, बदनामी करणाऱ्या लोकांवर तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाही केली जावी तसेच भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना करावी असे निवेदन विहिंप बजरंग दल व अन्य हिंदुत्ववादी संघटना तर्फे करण्यात आले आहे .
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा