नायगाव तहसील व नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील सं.गां.योजनेच्या असिस्टंट यांचे उपोषण सुरू
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील तहसील कार्यालयातील सं.गा.यो.विभागांमध्ये कार्यरत असलेले आयटी असिस्टंट सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत संजय गांधी योजनेतील आयटी असिस्टंट तीन महिन्यांपासून मानधन रखडले आहे. तसेच आयटी असिस्टंट आपरेटर यांना सन १९१३ ते १९१६ पर्यंत ५५०० एवढे तुटूपुजे मानधन मिळत होते . त्यानंतर 16 नंतर आठ हजार आठशे एवढे मानधन देण्यात आले मागच्या एक वर्षापासून महिन्यासाठी केवळ 11000 252 रुपये मिळाले. तुटपुंचे मानधन मिळाले त्यामुळे त्या मानधनात वाढ करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
या मागणीसाठी मानधन वाढवण्यात यावे असा प्रश्न सर्व कर्मचारी उपस्थित केला आहे . सामाजिक न्या. स. विभाग अंतर्गत संजय गांधी योजनेसाठी प्रत्येक तहसील कार्यालयातील जिल्ह्याधिकारी कार्यालय व आयुक्त कार्यालयामध्ये प्रत्येक एक आयटी असिस्टंट कार्यरत आहे. नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यात 16 व नांदेडचे दोन एकूण अठरा आयटी असिस्टंट तसेच महाराष्ट्रात 419 असिस्टंट आझाद मैदान मुंबई येथे मानधन वाढीव मिळावे यासाठी उपोषणाला बसले आहेत.
केंद्र शासनाने सामाजिक न्याय विशेष विभागाअंतर्गत पोर्टलवर कामे करण्यासाठी प्रत्येक महिन्याला आलेले नवीन अर्ज छाननी करून , बैठकीस ठेवणे तसेच सांगायो, विभागावरील अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगितलेल्या ऑफलाइन ऑनलाईन असे सर्व कामे असिस्टंट करतात शिवाय वेळोवेळी लागलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसह जिल्हा परिषद विधानसभा लोकसंख्या कोणतीही कामे आदेशानुसार करत आहेत.मानधन कमी मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता कोरोना महामोरच्या संकटातही काही आयटी असिस्टंट यांना आपला जीव लागला .
शासनाने मानधनात वाढ करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे . त्याबाबतचे निवेदन प्रशासनास अकरा एप्रिल २०२३ रोजी सादर करण्यात आले. निवेदनावर सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे साक्षर असून आझाद मैदान मुंबई येथे आज तिसऱ्या दिवसापर्यंत उपोषण सुरू आहे .आयटी असिस्टंट यांना 27 हजार रुपये मानधन देण्यात यावे. रखडलेले तीन महिन्यांचे मानधन त्वरित मिळावे, आसा प्रमुख मागणीसाठी 419 आयटी असिस्टंट आपरेटर यांचे मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आशी माहिती नायगाव तहसील कार्यालयातील आयटी असिस्टंट भास्कर पा.मोरे देगावकर यांनी आमच्या दैनिक वैराग्यमुर्ती चे नांदेड जिल्ह्य प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर यांच्याशी बोलताना माहीती दिली.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा