मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, यांच्याकडे मा.आ.परिचारक सातत्याने पाठपुरवठा करत होते
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर ( शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
तिर्थक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात येत असलेल्या नामसंकिर्तन सभागृहासाठी वैशिष्टयपुर्ण योजनेतून नगरविकास खात्याने 20 कोटी रूपये पंढरपूर नगरपरिषदेकडे वितरीत करण्याचे आदेश पारित केले असल्याची माहिती मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली.
पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना अनेक सोयी-सुविधांबरोबरच भजन, किर्तन आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रम घेता यावेत यासाठी मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व पंढरपूर नगरपरिषदकडून भव्य असा नाट्यगृहाचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सरकारकडून ऑक्टोबर 2016 मध्ये मंजूरी मिळाली होती. सुरवातीला 25 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. मंजूर झालेल्या निधीमधून सदर नामसंर्कितन सभागृहाचे बांधकाम काही प्रमाणात पुर्ण झाले आहे.
कोव्हिड साथीमुळे सरकारकडून निधी न मिळाल्यामुळे मागील तीन वर्षापासून सभागृहाचे काम बंद होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, यांच्याकडे नामसंर्कितन सभागृहाच्या उर्वरित कामासाठी 45 कोटी इतका निधी मिळावा म्हणून मा.आ.परिचारक सातत्याने पाठपुरवठा करत होते. दरम्यान काही महिन्यापूर्वीच मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार हे तिर्थक्षेत्र पंढरपूर दौऱ्यावर आले असता त्यांनी सभागृहाच्या कामाची पाहणी केली. यावेळी सदर कामासाठी 45 कोटी रूपयाची मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी मागणी केली होती. यामागणीची दखल घेवून मा.श्री.सुधीरभाऊ मुनगट्टीवार यांनी 20 कोटी रूपये मंजूर केले होते. गुरूवार दि.4 मे रोजी याबाबत पंढरपूर नगरपरिषदेस तिसऱ्या टप्यातील 20 कोटी रूपये वितरीत करण्याचे आदेश प्राप्त झाले आहे. उर्वरीत राहिलेल्या 25 कोटी रूपये निधीचा पाठपुरवठा मा.आ.प्रशांत परिचारक करत आहेत.
सदर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिकमंत्री मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.
---------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा