संतराम टोम्पे यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने सन्मानित
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा गुणवंत कामगार पुरस्कार ३३के.व्ही.उपकेद्र एम.आय.डि.सी. कृष्णुर येथिल वरिष्ठ यंत्रचालक संतराम नागोराव टोम्पे यांना नांदेड परिमंडळाचे अधिक्षक सुधाकरराव जाधव यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यकारी अभियंता पाटील, पंडित आंबेकर, वरिष्ठ तंत्रज्ञ तथा विज वितरण सोसायटी संचालक सतीश वाघमारे,एस.के.शिंदे पाटील,वडगावे,हनमंत एलवार,संदानंद मारावार, जाधव,गुडमलवार उपस्थित होते.सतत चार वर्षांपासून ३३के.व्ही. उपकेंद्र कृष्णुर येथिल वरीष्ठ यंत्रचालक कर्मचारी संतराम नागोराव टोम्पे यांनी नेमुन दिलेली सर्व कामे विद्युत वाहिनीची देखभाल करणे व विद्युत वाहिनी सुरळीत ठेवणे ,उपकेंद्राची देखभाल करणे, अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या समस्या तातडीने निराकरण करणे.
संभाव्य अपघात कार्यकौशल्याने टाळून उत्कृष्टपणे कर्तव्य पार पाडणे यामध्ये त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता, कर्तव्यदक्षता, निष्ठाव समर्पितवृती करून सतत २५ वर्षाची सेवा त्यांच्या कार्याचा, गुणांचा गौरव करुन सन २०२२-२०२३ चा गुणवंत कामगार उत्कृष्ट यंत्रचालक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी नांदेड येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक तथा मुख्याध्यापक हौसाजी वारघडे,जगन गोणारकर ,राहुल गोणारकर ,विनायक वाघमारे प्रा. अशोक कांबळे मु.अ.तथा धम्ममित्र एम.टी.वाघमारे ,डी.डी. वाघमारे बारुळकर,प्रा.गंगाधर वाघमारे भोपाळकर यांच्या सह अनेक मित्र मंडळी व नातेवाईक यांच्या कडून सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. या सन्मान कार्यक्रमा वेळी सर्व स्टॉप च्या कर्मचाऱ्यासह अनेक जण उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा