maharashtra day, workers day, shivshahi news,

आ.पवारानी उमरी विकासाकडे पाठच फिरवली

जनतेने पवारांची चांगलीच जिरवली


A. Pawar turned his back on Umri Vikas, umri, nanded, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर

 दोन तीन वर्षापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत नायगाव विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व कायम करण्यासाठी ज्या त्या राष्ट्रीय पक्षाच्या ऊमेदवारांनी आपापल्या परीने टोकाचे प्रयत्न केले होते.मात्र त्यात झालेल्या विजयी आमदाराने निवडून येण्यासाठी रोजगार,बेरोजगार,गरीब ऊपेक्षित,शेतकरी महिलांसाठी काही काम करुन दाखवायचं न बोलता मतदारांत श्रद्धेची सहानुभूती निर्माण करुन त्यांची मते हाडप करण्यासाठी वेगवेगळ्या देवांचे भंडारे करण्याचे सत्र चालवून मतदारावर एकप्रकारची मोहणी घालत मतदान मिळवल्याचे बोलले जाते. 

निवडून येऊन तीन वर्ष ऊलटली असली तरी,मतदार संघातल्या ऊमरी तालूक्यात शहराचा काही भाग वगळता ग्रामिण क्षेत्राच्या विकासाकडे शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाकडे त्यांनी पाठ फिरवली असे पहायला मिळते.विकासाच्या मुद्दयावर मत न देता केवळ भंडारे खाण्यासाठी पोटावर ऊठलेल्या मतदारांची त्यांनी चांगलीच जीरवली अशा बोलक्या प्रतीक्रिया तालूक्यात सर्वत्रच ऐकायला आता मिळत आहेत.देशातील निवडनूक आयोगा सारख्या अशा बऱ्याच स्वायत्त संविधानिक संस्था ह्या हल्ली केंद्र सरकारच्या अधिन झाल्यामुळं संविधानिक नियम कायद्याची अपेक्षित अशी अमलबाजावणी होत नाही.

 ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळं निवडणुकीत दारु पैसा कंबल मशीन मोबाईल वाटप करणाऱ्यां ऊमेदवारांना निवडणुक आयोगाची अप्रत्यक्ष  खूली सूट मिळते असे यापूर्वी अनेकवेळा पहायला मिळाले. असच काही २०१९ च्या नायगाव विधानसभा मतदार संघात घटित घडलं,निवडून येण्यासाठी तात्कालीन ऊमेदवाराने,आजच्या  सिटिंग आमदाराने लोकांची मते घेण्यासाठी मतदारांना वेगळच खिळून ठेवलं. त्यांनी मतदार संघात देवाच्या अस्थेद्वारे मतदारांच्या मनात घर केलं. दरम्यान मतदारसंघात त्यांनी भंडाऱ्यांवर भंडारे करुन जेवनाच्या बाबतीत लोकांना तृप्त केले.निवडनूका ह्या ऐन  पावसाळ्यात आल्यामुळं मतदारांची सहानुभूती मिळवन्यासाठी त्यांनी छत्र्याचे वाटप केले.

एवढ्यावर न थांबता त्यांनी आपण दिलेल्या लाॕलीपाॕपवरमुळं मिळनारं मतदान बाजूला जानार नाही याची दक्षता घेत चष्म्याचा पाॕईंट वाढलेल्या मतदारांना नविन चश्मे देखिल वाटप केले. परंतू जेंव्हा ऊमरीच्या विकासाची बारी आली तेंव्हा त्यांनी त्याकडे पाठ फिरवली. शहरात तूरळक ठिकाणचा अपवाद वगळता ग्रामिण भागात आज रस्ते लाईट नाल्यांची दुरावस्था असलेली पहायला मिळते.बेरोजगारासह शेतकऱ्यांची हालत दैनिय असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिवेशनात कधी प्रश्न मांडले नाही,महिलांची मते घेण्यासाठी त्यांना पावसापासून स्वरक्षण म्हणून छत्र्या वाटल्या परंतू घरगूती गॕसच्या वाढलेल्या किमतीवर दोन्ही अधिवेशनात भ्र देखिल काढला नाही.काँग्रेस सरकारच्या तूलनेत मोदी सरकारच्या काळात वाढलेल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करा असं सरकारला प्रश्न विचारायला देखिल त्यांची वाचा बंद झाली. 

त्यांचं नांदेड निवासी राहुन नायगाव विधानसभेचं नेतृत्व करनं म्हणजे ऊंटावरुन शेळ्या हाकन्या पलीकडे काही नाही असं ऐकायला मिळते. तालुक्यातून सुशिक्षित बेरोजगारांचे परप्रांतात होणाऱ्या स्थलांतरावर यांनी तर मौनच धरलं.निराधार योजना, विधवा पेन्शन व जेष्ठ गरीकांना मिळणारी मदत कागदावरच आहे.ऊमरी मुदखेड रोडवर अगदी गोरठ्या लगत जो भूयारी मार्ग झाला आहे,तो हल्ली रहदारीची डोकेदुखी होऊन बसली आहे.रेल्वे गाड्याची सततची ये-जा असलेला रेल्वे गेट बंद करुन भूयारी मार्गाच पर्याय अवलंबला असता तो सर्वांच्याच अंगट आला आहे. त्यात जमा झालेल्या पावसाच्या पाण्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यासाठी भूयारी मार्गापेक्षा रेल्वे गेटच बरा होता अशी म्हणायची आता पाळी आली आहे.

या विषयी संबधित प्रशासनासह भागाच्या आमदाराकडे लेखी तोंडी तक्रारी गेल्या तरीही ते आजपर्यंत बघ्याच्याच भूमिकेत आहेत.एकंदर पहाता नायगाव विधानसभा ईतीहासातल्या आमदारांपैकी वर्तमान आमदारांचे काम हे पोरगळ की बारगळ असच असल्याचे बोलले जाते.ऊमरी तालुक्यातील जनता ही सर्वच बाबीने त्रस्त आहे. विधानसभेच्या राज्याचेच वर्तन असे आसेल तर प्रजेने न्याय मागायचा तरी कोणाकडे अशी अवस्था होऊन बसली आहे. मतदार जागरुक नसल्याने ही आज वेळ ओढवली असली तरी,एकवेळच्या जेवनावर,दारु पैशावर मतदान करनाऱ्यां मतदाराची मात्र या आमदाराने चांगलीच जीरवली असे डायलाॕग सध्या नायगाव मतदारसंघात ऐकायला मिळत आहेत.


----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !