प्रहार संघटनेच्या वतीने महामंडळाचा निषेध करण्यात आला
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
जनतेसाठी काही सुविधा विद्यमान आमदार राजेश पवार हे करतील असं वाटलं होतं पण त्यांनी नायगाव शहराकडे कोणत्याही विकासात्मक कामासाठी पाठ फिरवली आहे तर नायगाव बस स्टैंड वर अपंग व्यक्तींना महामंडळाची बस देखील थांबत नसल्याने प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महामंडळाचा व आमदारांचा निषेध नोंदविला आहे.
वृत्त असे की, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते तालुका संघटक सुधाकर पांचाळ हे नायगावहुन कुष्णुर येथे लग्न समारंभासाठी जात असताना त्यांनी नायगाव बस स्टैंड वर ताटकळत उभे टाकले पण या अपंग व्यक्तीसाठी एकूण एकामागे एक महामंडळाच्या पाच बसेस आल्या पण कोणीही थांबलो नाही तर एकीकडे नायगाव येथे बस स्टॅन्ड देखील उपलब्ध नाही अपंग व्यक्तीसह अनेक महिला पुरुष वृध्दसाठी त्रास होत आहे.
विद्यमान आमदार राजेश पवार यांनी तर विकासात्मक पाऊल उचलतील असे वाटले होते पण नायगाव शहराकडे त्यांनी विकासाची पाठच फिरवली आहे म्हणून महामंडळाचा आणि आमदार राजेश पवारचा आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रहार संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आलेला आहे. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक रामदास पाटील भाकरे तालुका संघटक सुधाकर पांचाळ व अन्य प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
अपंग व्यक्ती समोर दिसल्यानंतर त्याची कोणालाही ओळख होते कारण हा अपंग आहे, असे वाटल्यावर त्यांच्याही विविध समस्या असतात विविध कामासाठी त्यांना एसटी महामंडळाने प्रवास करावा लागतो म्हणून अपंग व्यक्तींनी हात दाखविल्यानंतर महामंडळाने वाहने उभी करणे गरजेचे आहे याबाबत शासन दुर्लक्ष करीत असले तरी अपंग व्यक्तीचा कळवळा शासनाने जाणून घ्यावा अशाही भावना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहेत.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा