धर्माबाद येथील थरार
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नगरपालिके अंतर्गत सरस्वती नगर येथील घराशेजारीच राहणा-या मित्रानेच आपल्या मित्राचा दगड घालून खून केल्याची घटना रात्री अकरा वाजता घडल्यामुळे धर्माबाद शहर हादरले आहे.आरोपी उत्तम कांचने वय 28 राहणार सरस्वती नगर व मयत क्रांती बन्सी उबाळे वय 28 राहणार सरस्वती नगर हे समवयस्क तरुण मित्र दररोज एकत्र राहत होते.
पण काल काय झाले कोणास ठाऊक दोघेही उर्दू शाळेच्या मागील बाजूस प्रांगणात बसले होते. दोघांमध्ये कुठल्या गोष्टीसाठी शाब्दिक वादावादी झाली हे कळाले नसले तरी त्या वादातून आरोपी सचिन उत्तम कांचने यांनी मयत क्रांती बन्सी उबाळे यांच्या डोक्यात दगड घातला त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी तपास चक्र फिरवून नाकाबंदी केली .
दोन तासात आरोपीस शोधून काढून अटक केली. मयत क्रांती उबाळे यांची मावशी धुरपताबाई भीमराव दगडे राहणार सरस्वती नगर यांनी फिर्याद दिल्यावर धर्माबाद पोलीस ठाण्यात गु.र.न. 98/23 कलम 302 प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक माधवराव वाडेकर यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते हे करीत असून या खुनामागे नेमके काय प्रकरण दडले आहे याचा शोध पोलीस घेत असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
आजची तरुण मुले हे दिवसेंदिवस विविध व्यसनामध्ये अडकल्या जात आहेत आणि विचाराने विकृत होत असल्याने अशी कृत्य घडत आहेत असेही धर्माबाद शहरातील नागरिक त्यातून चर्चा होत आहे..
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा