चक्रीवादळामुळे नागरिकांची तारांबळ उडाली
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर तांडा, सांगवी, धनज, मेळगाव, हुस्सा,कुंटूर, परिसरामध्ये जोरदार चक्रीवादळाचा तडाख्याने कुंटूर मध्ये अतोनात नुकसान झाले. कुंटूर मध्ये अनेक ठिकाणी झाडे तुटून रस्त्यावर पडल्याने , विजेचे 30 पोल पडून तुटून गेले तारे तुटून जमिनीवर पडल्याने घरावर पत्रे उडाले गाराचा पाउस दहा मिनिटे झाला. अनेकांच्या घरात पाणी शिरून पत्रे उडाल्याने जीवनाशक वस्तू भिजून गेल्या त्यामध्ये ज्वारी कपडे सर्व वस्तू भिजवून गेले नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
दुपारी तीन वाजून 45 मिनिटांना जोरदार वाऱ्याचा तडाखाला कुंटूर परिसरामध्ये चक्रीवादळाचा तडाखामुळे दहा मिनिटांमध्ये जोरदार वाऱ्यामुळे गावातील अनेकांच्या घरावर पत्रे उडून झाडे उन्मळून लाईटच्या पोलवर पडल्याने अनेक पोल तुटून तारे तुटून जमिनीदोस्त झालेली आहे तर जनजीवन विस्कळीत झाले . यावेळी कोणतीही जीवित आणि झाली नाही अशी माहिती ही परिसरातून नागरिकांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे नुकसान झाले शेतीचेही शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले सदर दहा मिनिटे गाराचा पाऊस परिसरात पडला होता त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे . वीज व दळणवळणाची सोय तारे व खांबे फुल दुरुस्त होते तर कमी दोन ते तीन दिवस लागतील अशी माहिती 33 के विभागाकडून मिळाले . 33 केव्ही विभागातील लाईनमिन बाहेर गावी राहत असल्याने गावात जनजीवन विस्कळित झाले तरीही लाईन यांना काही देणे घेणे नसल्याची परिस्थिती आली आहे. वीजेचे पोल तारा दुरुस्ती होईपर्यंत पाणी पुरवठा वरही परिणाम होणार आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा