एकंदरीत महाराष्ट्रातील ठाकरे गट शिवसेनेकडे तरुणाचा मोठ्या प्रमाणात कौल
शिवाजी कुंटूरकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील मौजे खुजडा व टाकळी या गावात ठाकरे गट शिवसेनेची शाखा स्थापन करून या दोन्ही शाखेचे उद्घाटन युवा सेना जिल्हाप्रमुख गजानन भाऊ कदम यांच्या हस्ते तर युवा सेना जिल्हा प्रमुख बबनराव बारसे तालुकाप्रमुख पिंटू पाटील वासरीकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि युवा सेना तालुकाप्रमुख शिवाजी पाटील गाडे यांच्या नेतृत्वाखाली स्थापना करण्यात आली.
एकंदरीत महाराष्ट्रातील ठाकरे गट शिवसेनेकडे तरुणाचा मोठ्या प्रमाणात कौल होता व दिसत आहे. शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मुदखेड तालुका युवा सेना तालुकाप्रमुख शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली खुजडा आणि टाकळी या दोन गावात ठाकरे गट शिवसेना शाखा स्थापना करण्यात आली यामध्ये गाढे म्हणाले की, मुदखेड तालुक्यात आणखी जोमाने ठाकरे गट शिवसेनेच्या शाखा स्थापन होणार आहेत.
असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. या शाखा स्थापन झालेल्या वेळी शहर प्रमुख सचिन केंद्रे विधानसभा प्रमुख विश्वंभर पवार उपजिल्हाप्रमुख उत्तम खवर तालुका समन्वयक माणिक लोमटे अनिल कुरे चक्रधर कुरे श्री प्रभू कुरे, किशन कुरे शाखाप्रमुख प्रताप पाटील शिंदे, योगेश शिंदे, चक्रधर शिंदे व गावातील नागरिक आणि अन्य युवासैनिक व शिवसैनिक उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा