राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी जगदीश कोरीमठ सोलापूर
आज दिनांक 31 मे 2023 स्थळ जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सोलापूर व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व मानसिक आरोग्य नशाबंदी संघटक तसेच जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 31 मे 2023 जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त दंत आरोग्य तपासणी शिबिर मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा परिषदे च्या प्रांगणात करण्यात आले.
सदर कार्यक्रमा प्रसगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनूर यांनी उपस्थिती व समाज कल्याण अधिकारी सुनील खामितकर जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी धनराज पाटिल जिला परिषदे च्या सर्व उपक्रमा मध्ये स्वच्छता राखण्या चे आवाहन केले तसेच तंबाखू चे सेवन करून कुठेही थुकू नये याबाबत उपस्थितांना आवाहन केले तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनराज पाटील यानी ही तंबाखू सेवन विरोधात मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या औचित्य साधून युवकां मध्ये तंबाखू चे दुष परिणाम याबद्दल जनजागृती व्हावी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शपथ देण्यात आली.
दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय येथील तपासणी वाहनाचे उद्घाटन अतिरिक मुख्य कार्य अधिकारी संदीप कोहिनूर कर यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी सुनील खामितकर डॉक्टर धनराज पाटील उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोनिका हिरेमठ , बांगर , रुस्तुम कंपली ( नशाबंदी संघटक सोलापूर ) , जोशी सर , शशिकांत ढेकडे , स्वाती गायकवाड यांनी परिश्रम घेतले डॉक्टर धनराज पाटील व सुनील खामितकर यांनी लोकप्रदान न्यूज चॅनलला काय माहिती दिली पहा या बातमीचे वृत्त संकलन केले आमचे पत्रकार गफूर सौदागर यांनी
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा