भाजपाचे युवा नेते बालाजीराव बच्चेवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी मोठे करण्यासाठी ज्यांनी अपार अशी परिश्रम आणि मेहनत घेतलेली आहे असे भाजपाचे युवा नेते बालाजीराव बच्चेवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा नायगाव नगरीमध्ये नुकताच संपन्न झालेला आहे या निमित्ताने दिनदर्शिकेचेही वाटप करण्यात आले आहे.
भाजपाचे नेतृत्व गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने राबवीत असलेले भाजपा युवा नेते बालाजीराव बच्चेवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केलेल्या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बहुजन नेते माणिकराव लोहगावे, रावसाहेब पाटील मोरे, माधव चिंचले नारे सर संजय मोरे, शंकर वरपत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व मित्र मंडळी आणि चाहत्या वर्गाकडून बालाजीराव बच्चेवार यांचे अभिष्टचिंतन झाल्यानंतर याप्रसंगी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बच्चेवार म्हणाले की, मी आमदार होण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडून मुलाखती देखील झालेल्या आहेत त्यामध्ये मी इच्छुक असून माझी ही मुलाखत मी दिलेली आहे.
पण खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि पक्षश्रेष्ठी जे निर्णय देईल ते मला मान्य राहील पक्ष वाढीसाठी मी पूर्वीही जोमाने काम केलेला आहे आणि यापुढे देखील कार्यशील राहील असेही बालाजी बच्चेवार यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भावना व्यक्त केले आहेत. तर शेवटी सर्वांना या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिकाचीही वाटप करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा