मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव मा.भवरे यांची तक्रार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
पंचायत समिती नायगांव (खै) चे गटविकास अधिकारी एल. आर.वाजे हे मुख्यालय सोडून रजेवर गेल्याने त्यांचा मुखेड पंचायत समितीमध्ये पंचायत विभागात कार्यरत असलेल्या विस्तार अधिकारी डि.व्ही. जोगपेठे यांना दिलेला अतिरिक्त कार्यभार नियमबाह्यच असल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाल्यानंतर त्यासह संबधितांच्या येथिल स्वाक्षरीतील सर्व कामकाज तातडीने रद्द करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मा.भवरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नायगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल.आर. वाजे यांनी मुख्यालय सोडून रजेवर गेल्याने त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार पंचायत समिती मुखेड येथिल पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी पदावर कार्यरत डि.व्ही.जोगपेठे यांना देण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर- घुगे यांनी दिनांक २७ रोजी निर्गमित केल्याने ते सदर पदावर रुजू झाले होते. याबाबत माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून माहिती प्राप्त करुन घेतल्यानंतर सदर बाब नियमबाह्यच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच प्राप्त माहितीच्या आधारावर पुराव्यानिशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा, नायगांवचे तालुका प्रभारी व माहिती अधिकाराचे सक्रिय कार्यकर्ता लक्ष्मणराव मा.भवरे यांनी सांगितले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा