सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे भाचे अक्षय खिलारे यांचा विवाह
शिवशाही वृत्तसेवा, अकलूज
फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन ,पुणे च्या बहुद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे महात्मा दिन आणि सत्यशोधक समाज स्थापना दिन शतकोत्तर सुवर्ण महोसत्वी वर्षानिमित्त दि.३० मे २०२३ रोजी दु.१२.३० वा. सूर्यचंद्र सांस्कृतिक भवन ,गिरझणी, अकलुज येथे सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा भाचा सत्यशोधक अक्षय सुनील खिलारे, अकलुज आणि सत्याशोधिका प्रतिका प्रकाश एकतपुरे, माळवाडी या पदवीधर वधू वरांचा मोफत ४३ वा .सत्यशोधक सोहळा संपन्न होणार आहे. संस्थेतर्फे हा पहिलाच अकलुज परिसरातील सत्यशोधक विवाह विधीकर्ते अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक रजिस्टर नोंदणी करून ,वर मामा म्हणून देखील लावणार आहेत.
या प्रसंगी ढोक यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम संस्थेचे वतीने भेट देण्यात येणार आहे.तर आई वडील ,मामा मामी यांना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र दिले जाणार आहे. यावेळी अक्षता म्हणून नेहमीप्रमाणे फुलांच्या पाकळ्या वापरण्यात येणार असून महात्मा फुले रचित मंगळाषटके चे गायन होणार आहे.
आयोजक सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की अकलुज परिसरातील संस्थेतर्फे हा पहिला सत्यशोधक विवाह असला तरी मीच मामा म्हणून भाच्याचा सत्यशोधक विवाह लावतोय ही देखील महत्वाची गोष्ठ आहे. आजच्या विज्ञान युगात वास्तव सर्व गोष्ठी माहिती होत असल्याने आपण आता अंधश्रध्दा , कर्मकांड , पंचांग आणि मुहुर्थ याला तिलांजली देऊन महापुर्षांचे विचाराने मानवताधर्म एकच समजून या पुढे सर्व कार्य पाडावीत. विवाहाच्या निमित्ताने पर्यावरण समतोल राखण्यासाठी आठवण म्हणून फळ झाडे व इतर झाडे लावावीत. तसेच स्री पुरुष समानता या उक्ती प्रमाणे दोन्ही कुटुंबाने निर्णय घेऊन वधू वरांचे वेळेत आर्थिक उधळपट्टी न करीता गरजूंना दानधर्म व शिक्षणासाठी मदत करीत सत्यशोधक पध्द्तीने विवाह लावावेत असे देखील सर्व समाजबांधवांना ढोक यांनी आव्हान केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा