चोरट्यांच्या तपासाकरिता पोलीस पथके रवाना
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी संजय क्षिरसागर
तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या हिवरखेड शहरातील दोन सराफ दुकानांवर दरोडा घालून चोरट्यांनी साडेतीन किलो चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांच्या तपासाकरिता पोलीस पथके रवाना झाली असून घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे.
या घटनेने हिवरखेड शहरात मोठी खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांची ही टोळी परराज्यातील अथवा पर जिल्ह्यातील असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. घटनेची हकीकत अशी कि, हिवरखेड शहरातील मुख्य रस्त्यालगत भवानी प्लाझा नामक व्यापारी संकुल आहे. या संकुलात अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत.
दि.७.५.२०२३ चे रात्री अंदाजे दोन ते तीन वाजता चे दरम्यान वेदप्रकाश वर्मा यांचे ओम ज्वेलर्स आणि मनोज लोणकर यांचे साक्षी ज्वेलर्स ही दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. त्यात वर्मा यांचे दुकानातून २ लक्ष ५ हजाराचे तर लोणकर यांचे दुकानातून १ ते १.५० लक्ष रुपये किमतीचे साडेतीन किलो चांदीचे दागिने लंपास करण्यात आले.
हा प्रकार घडल्याचे पहाटे ध्यानात आल्यानंतर घटनेची तक्रार हिवरखेड पोलिसात करण्यात आली. पंधरा दिवसांचे दीर्घ रजेनंतर कर्तव्यावर परतलेल्या ठाणेदार विजय चव्हाण यांनी घटनेची दाखल घेऊन चोरट्यांचे शोधार्थ पोलीस पथके रवाना केली आहेत.
मीत्यासोबतच घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे. यासोबतच तन्नू सोनी यांचे श्री साई ज्वेलर्स हे दुकानही फोडण्याचा चोरट्यांनी प्रयास केला. परंतु चैनल लॉक तोडण्यात त्यांना अपयश आल्याने हे दुकान बचावले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वाहन क्रमांक नसलेल्या पांढऱ्या बोलेरो वाहनाने हे चोरटे शहरात आले होते. ही गाडी व दुकानांची कुलपे हाताळताना तोंडाला रुमाल बांधलेले दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये �
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा