गुन्हे दाखल असूनही आरोपी फरार .
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे ईकळीमाळ येथील गावांमध्ये काही दलित समाजाच्या लोकांवर गावातीलच तरुणांनी डीजेच्या बॉक्स लावून लग्नाची वरातीमधून नाचत जात असताना आवाज ने शेजारी घरी असलेल्या शंकर जमनाची जोंधळे , हनमंत रामचंद्र सूर्यवंशी ,माधव कांबळे व इतर काही लोकांना त्रास झाला असून घरामध्ये जाऊन बसले असता पूर्वीची खुन्नस गायरान जमिनीचा वाद मनात धरून त्यांना बाहेर काढून मारहाण केले व त्यांचे डोके फोडले. अशी फिर्याद जमनाजी जोंधळे यांनी दिली आहे.
शंकर जमनाजी जोंधळे व हनमंत रामचंद्र सूर्यवंशी यांनी कुंटुर पोलीसाना माहिती दिली आहे. जमनाजी जोंधळे त्यांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .आज 5/5/2023 रोजी कुंटुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय अटकुरे यांनी तसेच डीवायएसपी विक्रांत गायकवाड यांनी ईकळीमाळ येथील परिस्थितीचा आढावा घेऊन सदर आरोपीवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ऍट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे 12 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर बाराआरोपिने गैर कायद्याची मंडळी जमवून धमकी देऊन,धेडगमा, माहारडया आशिल शिवीगाळ केली. मारहाण केली असून सदर डोक्यावर काठ्याने व दगडाने मारहाण केल्याने डोके फुटून रक्त सांडल्याने सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शंकर जमनाजी जोंधळे व हनमंत सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर आरोपी , बालाजी पुयड, गणपती पुयड, काशिनाथ मोहन पुयड, माधव पुयड, दत्तराम बाबाराव पुयड , नारायण बाबा पुयड, साईनाथ जगदेवराव सुगावे, शिवाजी मारुती सुगावे , ओमकार सुगावे , बालाजी हनुमंत पूयड, ज्ञानेश्वर गंगाधर सुगावे , सूर्यकांत हनुमंत पुयड, एकूण बारा आरोपीवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या आदेशानुसार संजय आटकुरे साहाय्यक पोलीस निरीक्षक कुंटूर हे तपास करीत आहेत.
ईकळीमाळ येथे दोन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावात शांतता असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. सदर अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे विविध कलमाखाली 12 आरोपी विरुद्धात गुन्हा दाखल झाला . सदर 5/5/2023 रोजी वेळ 5=49 वाजता गुन्हा दाखल झाला आहे . सदर माहिती पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पवार यांनी दिली असून पुढील तपास संजय आटकोरे हे पुढील तपास करीत आहेत.

----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा