भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर
महाराष्ट्रातील भाजपा-शिवसेना महायुतीसरकार व भाजपा महाराष्ट्र राज्याचे विशेष निमंत्रित सदस्य तथा देगलूर-बिलोली विधानसभेचे लोकप्रिय मा.आमदार सुभाषराव साबणे साहेब यांच्या तर्फे प्रकाशित केलेले आपलं सरकार आपला अर्थसंकल्प या 50,000 (पन्नास हजार) पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज भाजप प्रदेशाध्यक्ष मा. आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी उपस्थित नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा.श्री प्रतापराव पाटील चिखलीकर , विधान परिषदेचे आमदार मा.श्री राम पाटील रातोळीकर, मुखेड-कंधार विधानसभेचे आमदार डाॅ.तुषार राठोड, किनवट-माहूर विधानसभेचे आमदार मा.श्री भिमराव केराम, नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार, भाजपा नांदेड (ग्रा.) जिल्हाध्यक्ष मा.श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपा नांदेड महानगराध्यक्ष मा.श्री प्रविण साले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी देगलूर-बिलोली विधानसभेतील भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा