नायगाव येथे नवीन जना बँक शाखा उघडण्यात आली
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
भारतात एकूण 759 तर महाराष्ट्रात 77 जना स्मॉल फायनान्स बँक शाखा कार्यरत असून नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यासह महिला व पुरुष बचत गटाच्या उन्नतीसाठी शहरातील मेडेवार कॉम्प्लेक्स येथे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या हस्ते जना बँके शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
भारतातील सर्वात मोठ्या लघु वित्त बँकापैकी एक जना स्मॉल फायनान्स बँकेने सर्व समावेशक बँकिंगला आपल्या केंद्रस्थानी ठेवत नायगाव येथे हि नवीन जना बँक शाखा उघडण्यात आलेल्या वेळी उद्घाटक म्हणून तहसीलदार गजानन शिंदे यासह सदर बँकेचे प्रमुख सुधीर माधवन, विभागीय प्रमुख पठाण फिरोज खान, ज्येष्ठ पत्रकार शेख वहाबोद्दीन, प्रसिद्ध व्यापारी सदानंद मेडेवार, वाईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे, तालुकाध्यक्ष नागेश कल्याण, पत्रकार माधव बैलकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जना बँकेची ही नवीन शाखा ग्राहकापर्यंत सेवा विस्तारित करण्याचा योजनेचा एक भाग आहे.
या लॉन्स सह बँक ग्राहकांना बँकिंग सेवा प्रधान करण्याच्या दिशेने आपली बांधिलकी वाढवत असून ही शाखा ग्राहकांना दायित्व, सोने कर्ज सेवा आणि कर्ज उत्पादनाच्या विस्तृत श्रेणीसह बँकिंग सेवा प्रधान करेल असे बँकेच्या वरिष्ठांनी मत व्यक्त केले आहे, तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यासह महिला बचत गटाच्या उन्नतीसाठी जना बँक सातत्याने कार्यरत राहील असे उद्घाटन प्रसंगी तहसीलदार गजानन शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
यावेळी कोलंबी नगरीचे सरपंच प्रतिनिधी प्रल्हाद बैस, उपसरपंच ज्ञानोबा गवाले, सदर बँकेचे शेख शकील यासह विविध गावातील महिला बचत गटाच्या पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी, व बँक शाखेतील सर्व कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.
सदर बँकेचे उद्दिष्ट सर्वसामान्य होतकरू साठी असल्याचे बँकेच्या वरिष्ठांनी सांगितल्यानंतर तहसीलदार गजानन शिंदे यासह जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे आणि नागेश कल्याण यांनीही आपले मत व्यक्त केले आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा